मुंबई: सध्याच्या काळात राज्यातील बळीराजासमोर आर्थिक अडचणी आणि शासकीय निकषांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पिक कर्जाव्यतिरिक्त शासनाच्या शेतीपूरक व इतर विविध विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर अटींचा डोंगर उभा राहिला आहे. पाईपलाईन, कुक्कुटपालन, शेळीपालन, डेअरी, दुग्धव्यवसाय, ट्रॅक्टर खरेदी, दूध वाहतूक करण्यासाठी टेम्पो किंवा इतर शेतीपूरक व्यवसायांसाठी बँकांकडून कर्ज प्रकरणे करताना 'अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना' असो किंवा इतर कोणत्याही शासकीय योजना असोत, बँका आता कडक निकष लावत आहेत. बँक कोणताही विचार न करता केवळ एकच अट प्रामुख्याने पुढे करते, ती म्हणजे संबंधित शेतकऱ्याकडे मागील ३ ते ४ वर्षांचे 'इन्कम टॅक्स रिटर्न' (ITR) असणे बंधनकारक आहे.
सध्याच्या परिस्थितीनुसार, जर शेतकऱ्याचा सिबिल (CIBIL) स्कोर खराब असेल किंवा मागील काही वर्षांमधील बॅलन्स शीट (Balance Sheet) उत्तम नसेल, तर बँका पिक कर्ज किंवा व्यवसाय कर्ज देण्यास स्पष्ट नकार देतात. जेमतेम ३ ते ४ वर्षांची उत्तम आर्थिक बाजू आणि ITR दाखवणाऱ्या मोजक्याच शेतकऱ्यांना कुठे तरी थोडेफार कर्ज मंजूर होते. मात्र, यामध्ये सर्वात मोठा विरोधाभास आणि पेच असा निर्माण झाला आहे की, जर शेतकऱ्यांनी शासनाच्या अटी पूर्ण करण्यासाठी आणि कर्ज मिळवण्यासाठी ITR भरायला सुरुवात केली, तर शासन भविष्यात घोषित होणाऱ्या 'कर्जमाफी'च्या लाभापासून या शेतकऱ्यांना वंचित ठेवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शासन स्तरावरून वेळोवेळी अशा प्रकारच्या चर्चा समोर येतात की, जे शेतकरी किंवा नागरिक आयटीआर (ITR) भरतात, ते करदाते असल्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. जर खरोखरच ही भूमिका कायम राहिली, तर शेतकरी एका मोठ्या दुष्टचक्रात अडकणार आहेत. एका बाजूला जोडधंदा व शेती व्यवसायाच्या विकासासाठी योजनांचे कर्ज हवे असल्यास ITR आवश्यक आहे, आणि दुसरीकडे ITR भरल्यास भविष्यातील कर्जमाफी मिळणार नाही, अशी दुहेरी भूमिका शेतकऱ्यांसाठी विघातक ठरू शकते.
या संपूर्ण परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकरी वर्गातून असा सवाल केला जात आहे की, जर भविष्यात प्रत्येक शेतीपूरक व्यवसायासाठी ITR सक्तीचा केला गेला आणि ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले, तर हा प्रकार म्हणजे हुकूमशाहीच म्हणावा लागेल. या भीतीपोटी भविष्यात कोणताही शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने ITR भरणार नाही आणि जर ITR भरला नाही, तर बँका वरील सर्व शेतीपूरक व्यवसायांसाठी कर्ज देणार नाहीत. परिणामी, भांडवल आणि कर्जाच्या अभावी ग्रामीण भागातील शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत सापडतील, ज्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने या अटींचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना सुलभ व विनाअट आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




