पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!

पुणेः शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आंबेगाव बुद्रुक भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले अल्पवयीन वर्गमित्र आहेत. अल्पवयीनांनी केलेल्या हल्ल्यात १५ वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शाळकरी मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन अल्पवयीनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगा आणि या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेली मुले हे वर्गमित्र आहेत. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. तक्रारदार मुलगा हा वडगाव बुद्रुकमधील घुलेनगर परिसरात राहायला आहे. मंगळवारी (दि. २९) दुपारी बाराच्या सुमारास तो शाळेत निघाला होता. आंबेगाव बुद्रुक भागातील दभाडी परिसरात शाळकरी मुलाला वर्गमित्रांनी गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून ते पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

पोलिसांनी पसार झालेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत. शाळकरी मुलांमधील वादातून मारामारीच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. भवानी पेठेतील एका शाळेसमोर मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *