हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी आणि संपूर्ण समाजमनाला चक्रावून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर आणि आनंदाचे वातावरण असायला हवे होते, तिथे मधुचंद्राच्या (सुहागरात) रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी एका नवविवाहित नवरदेवाने रेल्वेगाडीसमोर उडी मारून आपले जीवन संपवले.
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती-पत्नीत गंभीर वाद झाला होता, ज्यानंतर पत्नीच्या काही मित्रांनी नवऱ्याला फोनवरून ब्लॅकमेल आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली होती, असा खळबळजनक आरोप मृतकाच्या भावाने केला आहे. या धक्कादायक घटनेच्या १६ दिवसांनंतर पोलिसांनी मृत ओमप्रकाश याची पत्नी आणि तिच्या चार मित्रांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
२९ एप्रिलला थाटामाटात झाले होते लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, मृत ओमप्रकाश (ओमी) याचे लग्न २९ एप्रिल रोजी भूमिका नावाच्या तरुणीशी अतिशय थाटामाटात पार पडले होते. लग्न पार पडल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, २९ आणि ३० एप्रिलच्या दरम्यान असलेल्या पहिल्या रात्री (मधुचंद्राच्या रात्री) ओमप्रकाश आणि त्याची पत्नी भूमिका यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण आणि वाद झाला.
१ मेच्या सकाळी चार नंबरवरून आले धमक्यांचे फोन!मृतकाचे भाऊ जय भगवान यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुहागरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ओमप्रकाशच्या मोबाईलवर चार वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन येऊ लागले. फोन करणारे दुसरे तिसरे कोणी नसून नवरी भूमिका हिच्या जवळचे मित्र अजय निषाद, संजीव, नारायण सिंह आणि वेदराम हे होते. हे चौघेही ओमप्रकाशला फोन करून सातत्याने धमक्या देत होते, शिवीगाळ करत होते आणि मानसिक छळ करत होते.
घाबरलेल्या मुलाने वडिलांना सांगितली हकीकत
सतत येणाऱ्या या धमक्यांच्या फोनमुळे आणि मानसिक त्रासामुळे ओमप्रकाश आतून पूर्णपणे हादरला होता आणि प्रचंड मानसिक तणावाखाली आला होता. त्याने तात्काळ आपले वडील अशोक यांच्याकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला की, "भूमिकाचे मित्र मला सतत फोन करून त्रास आणि धमक्या देत आहेत." वडिलांनी आपल्या मुलाला धीर देण्याचा आणि समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
... अन् ओमीने रेल्वेसमोर घेतली उडी!
परंतु, आरोपींकडून होणारा छळ आणि धमक्यांचा पाऊस थांबत नसल्याने शेवटी हताश झालेल्या ओमप्रकाशने १ मे रोजी दुपारच्या सुमारास होडल रेल्वे स्टेशन गाठले. तिथे येणाऱ्या एका वेगवान ट्रेनसमोर त्याने थेट उडी मारली. ट्रेनची जोरदार धडक बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या भयानक घटनेने दोन्ही कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत ओमप्रकाशच्या भावाच्या तक्रारीवरून पत्नी भूमिका आणि तिचे मित्र अजय निषाद, संजीव, नारायण सिंह आणि वेदराम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


