मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक (मॅनेजर) दिशा सालियन हिच्या गूढ मृत्यू प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "दिशा सालियनच्या मृत्यूबाबत तिच्या वडिलांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता, असे असतानाही पोलिसांनी एफआयआर (गुन्हा) का नोंदवला नाही? प्रकरणाची नोंद केवळ 'अपघाती मृत्यू' (ADR) अशी का करण्यात आली? आणि कोणत्या बाबींमुळे पोलिसांना या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करण्यापासून रोखण्यात आले?" असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीदरम्यान विचारला.
न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या हायप्रोफाइल प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपासातील त्रुटींवर बोट ठेवत पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
घटना आणि न्यायालयाचे निरीक्षण
दिशा सालियन हिचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुरुवातीला 'अपघाती मृत्यू' अशी नोंद करून चौकशी केली होती आणि अखेरीस तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेत एक याचिका दाखल केली. आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. तसेच, या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून प्रकरणाची चौकशी सीबीआय (CBI) कडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी विनंती त्यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी राजतर्फे बाजू मांडताना सांगितले की, "या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू अशी करण्यात आली होती आणि पोलिसांनी दोनदा सखोल चौकशी केली. दोन्ही वेळा चौकशीत तिने जीव दिल्याचेच निष्पन्न झाले असून, या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांवरूनही या निष्कर्षाला दुजोरा मिळाला आहे."
तथापि, सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने शवविच्छेदन (Post-mortem) अहवालावरून अत्यंत महत्त्वाचा आणि तांत्रिक प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने विचारले की, "जर एखादी व्यक्ती १४ मजल्यांच्या प्रचंड उंचीवरून खाली पडली, तर तिच्या शरीरावर कोणतीही मोठी दुखापत होणार नाही का? शवविच्छेदन अहवालानुसार इतक्या उंचावरून पडूनही शरीरावर दुखापती कशा आढळल्या नाहीत?"
यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी सांगितले की, उपलब्ध छायाचित्रांनुसार संबंधित व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाल्याचे दिसून आले होते. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांनी आक्षेप घेत पोलिसांच्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये अशा प्रकारच्या दुखापती नसल्याचा दावा केला आणि नंतर ते फोटो बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप केला.
तसेच, उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरत विचारले की, जेव्हा पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणात कोणताही एफआयआर नोंदवला गेला नाही आणि केवळ अपघाती मृत्यूची चौकशी सुरू आहे, तेव्हा अपघाती मृत्यू अहवाल (ADR) यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे याचिकाकर्त्या वडिलांना देण्यापासून पोलिसांनी का रोखले? कागदपत्रे लपवण्यामागे नेमके कारण काय, असा सवालही न्यायालयाने केला.
या महत्त्वपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी आगामी २४ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित करण्यात आली असून, त्यापूर्वी सर्व बाजूंच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




