पुणे: एक अत्यंत खळबळजनक आणि मोठा आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. कंपनीने दाखविलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत एका कर्मचाऱ्याने खर्च परताव्यासाठी बनावट ई-मेल, खोटी बिले, व्हाउचर तसेच इलेक्ट्रॉनिक नोंदी तयार करून तब्बल २ कोटी ४५ लाख ३६ हजार ५८४ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून कसून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, या प्रकरणी योगेश सुरेश दीपांकर (वय ४४, रा. बालेवाडी) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कौस्तुभ शिवकुमार विभुते (वय ३४, रा. मुंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना ११ जून २०२४ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली असून, अलीकडेच याप्रकरणी पोलिस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
कसा केला अपहार?
आरोपी कौस्तुभ विभुते याने कंपनीच्या निधीचा अपहार करण्याचा अप्रामाणिक व फसवणुकीचा हेतू बाळगून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बनावट खर्च, परतफेड कर्ज, बनावट व्हाउचर, इलेक्ट्रॉनिक नोंदी तसेच खोटे ईमेल तयार केले. हे सर्व बनावट दस्तऐवज खरे असल्याचा भास त्याने कंपनीत निर्माण केला. एवढेच नव्हे तर, कंपनीच्या ईआरपी प्रणालीतील (ERP System) माहिती आणि बँक खात्यांच्या तपशीलामध्येही मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले.
आरोपीने चलाखी करत मूळ विक्रेत्यांची (Vendors) नावे आणि बिल क्रमांक तसेच ठेवले, परंतु लाभार्थी (बेनिफिशियरी) बँक खाते, आयएफएससी कोड आणि पेमेंटची माहिती बदलून टाकला. त्यामुळे प्रत्यक्ष विक्रेत्यांना मिळणारी रक्कम वळती होऊन ती थेट आरोपीच्या स्वतःच्या बँक खात्यात जमा झाली. विशेष म्हणजे, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) नावाने बनावट ई-मेल तयार करून ते अधिकृत व उच्चस्तरीय निर्देश असल्याचा बनाव त्याने रचला. संबंधित विभागाने स्वतंत्र पडताळणी न करता आरोपीने दिलेल्या खात्यांमध्ये पैसे वर्ग केल्यामुळे कंपनीची तब्बल २ कोटी ४५ लाख ३६ हजार ५८४ रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाली.
बाणेर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यातील संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


