अमरावती: महिला लैंगिक अत्याचार व देशी कट्टा विक्री प्रकरणातील आरोपी तथा निलंबित तलाठी विपुल ठाकरे यानेच स्वतःच्या राहत्या घरावर गोळीबार घडवून आणल्याचा धक्कादायक उलगडा झाला आहे. गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत या थरारक घटनेचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या चौघांपैकी एकाला आरोपी विपुल ठाकरे याने स्वतःच्याच घराच्या दिशेने फायर करण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली होती. मात्र हे त्याने का पटवून आणले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याच्या अटकेनंतरच त्या कारणाची उकल होऊ शकेल.
दुचाकीवरून आलेल्या बुरखाधारी दोघांनी आपल्या घराच्या आवारात व आपल्या दिशेने एकूण दोन गोळ्या झाडल्या, अशी तक्रार विपुल ठाकरे यांच्या पत्नी आरती यांनी नोंदविली होती. त्या तक्रारीनुसार गाडगेनगर पोलिसांनी दि. १० ऑगस्ट रोजी पहाटे संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमानवे केला. १ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ९.३० च्या सुमारास अर्जुननगर परिसरातील मॉ जिजाऊ कॉलनी येथील विपुल ठाकरे याच्या घरासमोर ही घटना घडली होती. याप्रकरणी, बादशहासिंग अजाबसिंग टांक (४२), राजासिंग अजाबसिंग टांक (३२, दोन्ही रा. वडाळी), अजय भोसले (३१, रा. राजुरा) व चंद्रसिंग शाकला (३०, रा. राजस्थान, ह.मु, विपुल ठाकरेचे घर) यांना अटक केली आहे. चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. घटनास्थळी दोन रिकामी काळतुसे सुद्धा मिळाली होती.
वडाळीतून अटक
पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी तात्काळ गुन्हे शाखेची सहा पथके तयार केली. त्यानुसार जवळपास १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दरम्यान वडाळी परिसरातून बादशहासिंग व अजय भोसले या दोघांना ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. फिर्यादी महिलेचे पती विपुल ठाकरे याने फायरिंग करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे बादशहासिंग याने कबूल केले. त्या रकमेपैकी १० हजार रुपये चंद्रसिंग उर्फ शेरू सिंग शाकला याच्या माध्यमातून देण्यात आले. विपुल ठाकरे यानेच तो कट रचल्याची कबुली आरोपींनी केली.
अंतरिम जामिनावर होती सुनावणी
विशेष म्हणजे, विपुल ठाकरे हा महिला अत्याचार व आर्म कायद्यांतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यांचा आरोपी आहे. २ जुलै रोजी पथ्रोट पोलिसांनी एका तरुणाकडून देशी कट्टा जप्त केला होता, ज्याने तो कट्टा विपुल ठाकरे याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली होती. त्या गुन्ह्यासंबंधाने ठाकरे याच्या अंतरिम 3 अटकपूर्व जामिनावर दि. १० ऑगस्ट रोजी अचलपूर न्यायालयात सुनावणी होणार होती.
न्यायालयात आपली बाजू मजबूत करण्यासाठी विपुल ठाकरे याने हा बनाव रचला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गुन्हे शाखाप्रमुख दिनेश दहातोंडे व अतुल वर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही उकल केली.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



