लोकप्रिय मद्य ब्रँड्स असलेल्या 'मॅकडॉवेल्स' (McDowell's) आणि 'ओल्ड मॉन्क' (Old Monk) रमच्या उत्पादनांवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) केलेल्या कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. एफएसएसएआयच्या कठोर आदेशावर उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, हा संपूर्ण वाद उत्पादनांच्या सुरक्षिततेचा किंवा गुणवत्तेचा नसून केवळ तपशीलपत्राच्या म्हणजेच 'लेबलिंग' (Labelling) पद्धतीशी संबंधित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उत्पादक युनिट्सच्या तपासणीनंतर FSSAI ने काढलेल्या बंदीच्या आदेशांना 'युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड' (United Spirits Ltd.) आणि 'मोहन मिकिन लिमिटेड' (Mohan Meakin Ltd.) या प्रमुख मद्य उत्पादक कंपन्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
काय आहे नेमका वाद आणि एफएसएसएआयची कारवाई?
-
उत्पादनांच्या निर्मिती व विक्रीवर बंदी: FSSAI च्या पथकाने कारखान्यांच्या केलेल्या तपासणीदरम्यान उत्पादनांच्या लेबलिंग, घटकांची रचना (Composition) आणि वापरण्यात आलेले फ्लेवरिंग एजंट्स या मुद्द्यांवर आक्षेप घेत नवीन स्टॉक तयार करण्यास आणि त्याच्या विक्रीवर प्रतिबंध घातले होते.
-
लेबलिंग बदलण्याची अट: प्राधिकरणाने जुना स्टॉक 'रम फ्लेवर्ड स्पिरिट' (Rum Flavoured Spirit) म्हणून पुन्हा लेबल करून विकण्याची मुभा दिली होती, मात्र कंपन्यांनी नवीन उत्पादनांवर घातलेली बंदी आणि लेबल बदलण्याच्या अटीला तीव्र विरोध करत न्यायालयात धाव घेतली. कंपन्यांच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, ही उत्पादने दशकांपासून एकाच प्रमाणित प्रक्रियेद्वारे तयार केली जात आहेत.
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण:
-
राத்தोरात सर्वकाही बंद करता येणार नाही: सुनावणीदरम्यान न्यायालयाने ताशेरे ओढले की, कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा सुनावणीची पुरेशी संधी न देता रातोरात अशा प्रकारे कारखाने किंवा उत्पादनांची विक्री बंद करता येत नाही.
-
सुरक्षिततेचा प्रश्न नाही: अन्न विश्लेषकांनी (Food Analysts) संबंधित मद्य पिण्यायोग्य नाही किंवा आरोग्यासाठी घातक असल्याचे कोठेही म्हटलेले नाही, या मुद्द्यावर न्यायालयाने लक्ष वेधले. हा वाद केवळ लेबलिंगच्या तांत्रिक बाबींशी जोडलेला असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना FSSAI च्या निर्देशांसह न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असून प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवली आहे.
शहर
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
महाराष्ट्र
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- महाराष्ट्र: लोकसहभागातून जलसंधारणाला वेग; चार गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




