पुणे: पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना भामट्यांनी आपले लक्ष्य बनवले आहे. गेल्या काही दिवसांत येथे एटीएम फसवणुकीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आठवडाभरातच दोन मोठ्या फसवणुकीच्या घटना समोर आल्याने बँकांची सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांची कार्यपद्धती पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
नेमका प्रकार काय? गेल्या आठवड्यात पिंगोरी येथील एका शेतकऱ्याच्या एसबीआयच्या एटीएममध्ये कार्ड बदलून ३० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेची धूळ बसते न बसते तोच गुरुवारी राख येथील मेंढपाळ व्यावसायिक अण्णा महानवर यांना फसवणुकीचा फटका बसला. अण्णा महानवर हे महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना "मी मदत करतो" असे सांगत विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन त्याने काही क्षणांतच त्यांच्या खात्यातील ४० हजार रुपये काढून घेतले आणि तो तिथून पसार झाला.
यंत्रणेच्या दिरंगाईमुळे फसवणुकीला बळ फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महानवर यांनी तातडीने शेजारील बँकेत धाव घेतली. मात्र, बँक कर्मचाऱ्यांनी साधी विचारपूस करण्याऐवजी दाद दिली नसल्याचा आरोप पीडिताने केला आहे. त्यानंतर त्यांनी नीरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही त्यांना पोलिसांकडून "तिकडे जा, अर्ज करा, तक्रार करा" अशा स्वरूपाची बोळवण सहन करावी लागली. यामुळे संतापलेल्या पीडिताला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा लेखी तक्रार नोंदवण्यासाठी हेलपाटे मारावे लागले.
एटीएम केंद्रांवरील सुरक्षारक्षकांचा अभाव, सीसीटीव्ही फुटेजची वेळेवर पडताळणी न होणे आणि तक्रार निवारणासाठी बँकांकडून दाखवली जाणारी अनास्था यामुळे भामट्यांचे धाडस वाढले आहे. नागरिकांच्या कष्टाचे पैसे क्षणात चोरीला जात असताना, जबाबदार बँका आणि पोलीस प्रशासन जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel



एटीएम फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे ⚠️🏧 प्रशासनानेही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी. 👮♂️🔒