नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! २१४ एकर जमीन अधिग्रणाविरोधात ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

बांदा: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदा येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध दर्शवला असून, या महामार्गामुळे येथील नागरिकांचा कोणताही फायदा होणार नसून उलट मोठ्या प्रमाणावर जमीन बाधेत येणार असल्याचे स्पष्ट करत ग्रामसभेत या प्रकल्पाविरोधात एकमुखी विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आला.

बांदा येथे पार पडलेल्या ग्रामसभेत शक्तिपीठ महामार्गाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बांदा परिसरातील तब्बल २१४ एकर जमीन बाधित होणार असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली. या महामार्गामुळे केवळ बागायती, शेतजमिनी आणि स्थानिकांची श्रद्धास्थाने धोक्यात येणार नसून स्थानिक लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यावेळी प्रशासकीय कारभारावरही ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. महामार्गासंदर्भातील अधिसूचना ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली असली, तरी ती आक्षेप नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर लावण्यात आली. यामुळे नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत, "जर मुदत आधीच संपली असेल तर आम्ही आमचे आक्षेप नेमके कुठे आणि कसे नोंदवायचे?" असा सविस्तर सवाल उपस्थित केला.

या महामार्गामुळे विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्काच्या जमिनी उद्ध्वस्त होत असून बांदावासीयांनी या प्रकल्पाविरोधात सामूहिक गाऱ्हाणे मांडले आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे होणाऱ्या नुकसानाचा तीव्र निषेध करत ग्रामसभेत शासनाच्या या धोरणाविरोधात कायदेशीर आणि कडक लढा देण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *