मुंबई: लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा प्रवाशांचे सामान किंवा मौल्यवान वस्तू विसरल्याच्या घटना घडतात आणि अशा हरवलेल्या वस्तू परत मिळणे जवळपास अशक्य मानले जाते. मात्र, मुंबईतून एका थक्क करणाऱ्या घटनेत, तब्बल तीन वर्षांपूर्वी लोकल ट्रेनमध्ये विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका प्रवाशाला सुरक्षितपणे परत मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आणि प्रयत्नांमुळे हा चमत्कार घडला असून प्रवाशाला त्यांचे १२ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जसेच्या तसे परत मिळाले आहेत.
नेमक काय घडलं होतं?
तल्हाह मोहम्मद झाकीर अन्सारी असे या प्रवाशाचे नाव असून ते २ नोव्हेंबर २०२३ रोजी अंबरनाथहून सीएसएमटी (CSMT) कडे लोकल ट्रेनने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कुर्ला रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने असलेली आपली महत्त्वाची बॅग बाजूला ठेवली होती. ट्रेन जेव्हा भायखळा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पोहोचली, तेव्हा अन्सारी घाईघाईत खाली उतरले, परंतु त्यांची सोन्याच्या दागिन्यांची बॅग लोकलच्या डब्यातच विसरली.
काही क्षणानंतर आपली बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब मागची लोकल पकडून थेट सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले. संबंधित लोकलमध्ये जाऊन त्यांनी बॅगेचा कसून शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळून आली नाही. अखेर हताश होऊन त्यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन आपल्या दागिन्यांची चोरी किंवा हरवल्याची अधिकृत तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या तपासामुळे लागला सुगावा:
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) कसून तपासले. बऱ्याच तांत्रिक तपासाअंती पोलिसांच्या हाती एक भक्कम सुगावा लागला आणि त्यांनी या प्रकरणी अख्तर हुसैन मुस्तफा हुसैन शेख या संशयित आरोपीला शोधून काढून बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १२ लाख १५ हजार रुपये मूल्याचे संपूर्ण सोन्याचे दागिने सुरक्षितपणे जप्त केले. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि पडताळणी पूर्ण करून पोलिसांनी जप्त केलेले हे सोने व मौल्यवान ऐवज तक्रारदार तल्हाह अन्सारी यांच्याकडे सुपूर्द केला. तब्बल तीन वर्षांनंतर आपले हरवलेले व अफाट मूल्याचे सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळाल्यामुळे प्रवाशाने पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले असून मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




