पुणे, हैदराबाद, तुळजापूरकडे जाणारी वाहने आणि स्थानिक वाहतूक एकाच मार्गावर आल्यामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी सतत वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत होती. आता या दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. जुना पूना नाका ते बाळे परिसरात चार नवीन पूल उभारले जात असून, त्यातील तीन पूल ऑगस्टअखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. यामुळे स्थानिक वाहतूक महामार्गापासून वेगळी होऊन मुख्य मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांचे मूळ कारण:
-
नवीन महामार्ग तयार करताना जुना पूना नाका येथील एका बाजूचा पूल जुनाच ठेवण्यात आला होता. तसेच मडकी वस्ती, बाळे आणि परिसरातील स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्यायी पूल किंवा सर्व्हिस रोडची पुरेशी सुविधा नव्हती.
-
परिणामी, छोट्या अंतरासाठीही स्थानिकांना मुख्य महामार्गावर यावे लागत होते, ज्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढला होता. ही समस्या सोडवण्यासाठी १६ मार्च २०२४ रोजी निविदा प्रक्रिया राबवून चार नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले.
चार नवीन पुलांची सद्यस्थिती:
-
१) जुना पुना नाका (सांडपाण्याचा ओढा): या परिसरातील सांडपाण्याच्या ओढ्यावरील एक पूल बांधून पूर्ण तयार झाला असून, त्यावरील रस्त्याचे डांबरीकरणही झाले आहे. ब्रीजजवळचे थोडेफार काम बाकी असून पुढील १५ दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
-
२) स्मशानभूमीकडील पूल: जुना पूना नाका परिसरातील सांडपाण्याच्या ओढ्यावर दोन्ही बाजूला दोन पूल बांधले जात आहेत. यातील स्मशानभूमीच्या बाजूचा पूल उभारण्यात आला असला, तरी त्याचे बरेच काम बाकी असल्याने तो खुला होण्यासाठी ३५ ते ४० दिवस लागतील.
-
३ व ४) आदिला नदीवरील पूल (बाळेजवळ): बाळेजवळील आदिला नदीवर दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड बनवून दोन नवीन पूल उभारण्यात आले आहेत. पुलांची कामे आणि डांबरीकरण पूर्ण झाले असून, इतर उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर हे दोन्ही पूल ३० ते ३५ दिवसांत वाहतुकीसाठी खुले केले जातील.
तीन अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) होणार कमी:
-
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या चार किलोमीटर अंतरात तब्बल सात ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) आहेत. यामध्ये सिंहगड कॉलेज परिसर, केगाव पूल, शिवाजीनगर, बाळे पूल, जुना पूना नाका, मडकी वस्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यांचा समावेश आहे.
-
सलग तीन वर्षांत किमान पाच गंभीर अपघात किंवा दहा मृत्यू झालेल्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित केले जाते. बाळेजवळील आदिला नदीवरील दोन आणि जुना पूना नाक्याजवळील नवीन पूल सुरू झाल्यामुळे या परिसरातील तीन ब्लॅक स्पॉट कमी होण्याची दाट शक्यता आहे. चारही पूल पूर्ण सुरू झाल्यानंतर स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने वळवली जाईल, ज्यामुळे मुख्य मार्गावरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



