
Jayakwadi Dam : नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानंतर नगर जिल्ह्यातून त्याला तीव्र विरोध होत आहे. रस्त्यावरच्या लढाई बरोबरच आता न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन करत जायकवाडीला पाणी देण्यास विरोध केला असून आता अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा, संजीवनी आणि शंकरराव काळे या तीन कारखान्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
|
Mumbai Crime News : मुंबईत ५ शाळकरी मुलींसोबत शिपायाचं संताजनक कृत्य; पोलिसांत गुन्हा दाखल |
२००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत झाला होता. मात्र या कायद्यालाच विरोध होत असून या कायद्याचा फेरविचार व्हावा; अशी मागणी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून होताना दिसते. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी देऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांमधून पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा येथील पुणे- छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. कोपरगावमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी उपोषण करत विरोध केला. या पाठोपाठ आता शिंदे गटाचे शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सुद्धा जायकवाडीला पाणी देण्याचा विरोध करत नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
न्यायालयात याचिका दाखल
कोपरगावच्या काळे कारखान्याने केलेल्या याचिकेवर २० नोव्हेंबरपर्यंत गोदावरी पाटबंधारे महामंडळाला म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून यावर ५ डिसेंबरला सुनावणी होईल. तर विखे यांच्या प्रवरा कारखान्याने केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. दरम्यान संजीवनी साखर कारखान्याने देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून २१ डिसेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयीन लढाई बरोबरच आम्ही रस्त्यावरची लढाई सुद्धा लढणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केलं. तर जायकवाडीतून सर्वांनाच एकत्र पाणी मिळत असल्याने ते नेते एकत्र येतात. मात्र नगर आणि नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळी धरण असल्याने नेते वेगवेगळी भूमिका घेतात ही शोकांतिका आहे. मात्र आता सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचं आवाहन विवेक कोल्हे यांनी केला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




