
Pimpri-Chinchwad : आळंदी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. सहा वर्षीय धनश्री केदारी आणि ७० वर्षीय मंगल शिंदे यांच्या निर्घृण हत्येमुळे परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे.
गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्हे शाखेच्या युनिट तीनने आरोपीचा माग काढत आळेफाटा येथून त्याला अटक केली. विनायक तुकाराम भवारी (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मृत चिमुकली धनश्रीचा नात्याने आजोबा असल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
तपासानुसार, बुधवारी रात्री आरोपी घरात आला. तो संगीता केदारी यांचा पती असल्याने घरातील व्यक्तींना परिचित होता. त्या वेळी धनश्री आणि मंगल शिंदे घरात झोपल्या होत्या, तर संगीता केदारी या नाईट ड्युटीसाठी रुग्णालयात होत्या.
आरोपीने काही वेळ दोघींशी संवाद साधल्यानंतर संशयाच्या भरात संताप व्यक्त केला. मंगल शिंदे या आपल्या विरोधात भडकवत असल्याचा संशय त्याच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम मंगल शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली. त्यानंतर सहा वर्षीय धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीला कशी अटक झाली?
घटनेनंतर आरोपी आळेफाटा येथे पळून गेला होता. मात्र, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला अटक केली.
दरम्यान, संगीता केदारी आणि आरोपी यांचा दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. काही काळापासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने आरोपी वेगळा राहत होता. मंगल शिंदे या शेजारी असून आरोपीबद्दल नकारात्मक बोलत असल्याचा संशय त्याच्या मनात होता.
या दुहेरी हत्याकांडामुळे आळंदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




