आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पाणउतारा केला आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत वि. पाकिस्तान असा झालेला सामना पाक क्रिकेकप्रेमींसाठी एक दुस्वप्न ठरलं आहे, सगळ्यानंच ते विसरायची इच्छा आहे, पण दुर्दैवाने ते शक्य नाही. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये रविवारी रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं आणि 61 धावांनी शानदार विजय मिळवला. 176 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघाचा खेळ 114 धावांवरच आटोपला आणि भारताने सुपर-8मध्ये शानदार पद्धतीने धडक मारली.
भारताकडून हा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर, पाकिस्तानमध्ये दु:खाचं वातावरण असून पाकचा माजी खेळाडू, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा तर अगदी तिळपापड झाल्याचं पहायला मिळालं. शोएब अख्तरने पराभवानंतर थयथयाट केलाच पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावरही जोरदार टीका केली.
शोएब अख्तरने मोहसीन नक्वींची इज्जतच काढली
पाकच्या पराभवानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शोएब अख्तर स्पष्टच बोलला. क्रिकेट माहित नसलेली व्यक्ती पीसीबीचा अध्यक्ष आहे, त्यामुळेच पाकिस्तान संघासोबत हे घडत असल्याचं त्याने नमूद केला. ” एक माणूस ज्याला काही येत नाही, काही माहीत नाही, तो पाकि्तान क्रिकेट बोर्डाचा चेअरमन ( मोहसीन नक्वी) बनला आहे. तुम्ही काय करू शकता ? अशाने संघ कसा चालणार ? तुम्ही एका खेळाडूला (बाबर आझम) सुपरस्टार बनवलं आहे, पण तो तुम्हाला एकही सामना जिंकून देऊ शकत नाही ” अशा शब्दांत शोएब अख्तरने मनातली सगळी भडास बाहेर काढली. त्याचा रोख स्पष्टपणे नक्वी आणि बाबार आझम कडे होता.
तो एवढ्यावरच थांबला नाही, पुढे तो म्हणाला, ‘ जेव्हा अशा लोकांना स्टार बनवलं जातं, त्यांची निवड केली जाते तेव्हा प्रॉब्लेम तर येणारच. पण जगातला सगळ्यात मोठा गुन्हा काय माहीत आहे का ? जगातला सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे एखाद्या अयोग्य आणि अकार्यक्षम व्यक्तीला काम देणं. जेव्हा तुम्ही एखाद्या अयोग्य आणि अज्ञानी व्यक्तीला कामावर ठेवता तेव्हा ते तुमचा देश उद्ध्वस्त करतात. ते कोणत्याही संघटनेला पाडू शकतात. उदाहरणं तुमच्या समोर आहेत. तुम्ही हे समजून घेण्याइतके हुशार आहात.” असं म्हणत त्याने पराभवानंतर नक्वींवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
पाकचा नामिबियाशी सामना
रविवारी भारताकडून हार मिळाल्यानंतर पाकिस्तान आता ग्रुप ए पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्यावरती अमेरिकेचा संघ आहे. दोन्ही संघाचे 4-4 पॉईंट्स आहेत. पाकिस्तानचा शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना नामिबियाविरुद्ध असेल. सुपर 8 मध्ये धडक मारण्यासाठी त्यांना नामिबियाला हरवावंच लागेल.
भारताचा शानदार विजय
भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध एकूण नऊ सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ सामने भारताने जिंकलेत. यापैकी एक सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. तर, पाकिस्तानने 2021 साली मध्ये भारताविरुद्धचा एकमेव टी20 वर्ल्डकप मॅच जिंकली आहे. काल पाकने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर पहिले फलंदाजी करताना भारताने 7 विकेट गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियाकडून इशान किशनने 40 चेंडूत सर्वाधिक 77 धावा केल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 25 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी संघाचा खेळ 18 षटकांत फक्त 114 धावांवर आटोपला. पापकडून उस्मान खानने सर्वाधिक 44 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने नाबाद 23 धावांचे योगदान दिले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



