हवाई प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि वेळ वाचवणारा प्रवास मानला जातो. मात्र हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानाला उड्डाण करण्याची कायदेशीर परवानगी नसणे ही धक्कादायक बाब आहे. ही केवळ एक कल्पना नाही तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियासोबत घडलेली एक घटना आहे. एअर इंडियाने त्यांचे एअरबस विमान एकदा-दोनदा नाही तर 8 वेळा आवश्यक फिटनेस प्रमाणपत्राशिवाय उडवल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी झालेल्या या छेडछाडीविरुद्ध नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आता एअर इंडियावर दंडात्मक कारवाई केली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
DGCA ने एअर इंडियाला 1 कोटींचा दंड ठोठावला
भारतातील विमान वाहतुकीवर DGCA चे नियंत्रण आहे. DGCA ने एअर इंडियाला अंदाजे 1 कोटी 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या एअरबस ए320 विमानाने 24 ते 25 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रवाशांना प्रवास करून नेले. मात्र या विमानाकडे एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट (एआरसी) नव्हते.
विमान योग्य आणि उड्डाणासाठी सुरक्षित आहे यासाठी एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सुरक्षा आणि तांत्रिक तपासणीनंतरच DGCA कडून दरवर्षी ही परवानगी दिली जाते. मात्र या प्रमाणपत्राशिवाय या विमानाने उड्डाण केल्याचे समोर आले आहे.
एअरलाइनच्या कार्यप्रणालीवर प्रश्न
एअर इंडियाच्या एअरबस ए320 विमानाकडे एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट नव्हते हे एअरलाइनच्या कार्यप्रणालीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. एअर इंडियाने कबूल केले आहे की हे एक “सिस्टमिक अपयश” आहे. आता तपासत असे आढळले आहे की, आठ उड्डाणे करणाऱ्या वैमानिकांनी टेकऑफ करण्यापूर्वी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) पाळल्या नाहीत. जर वैमानिकांनी टेकऑफपूर्वी चेकलिस्ट तपासली असती तर कदाचित या विमानाने हवेत उड्डाण केले नसते.
आता DGCA कडून एअरलाइनला 30 दिवसांच्या आत दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 5 फेब्रुवारी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. डीजीसीएचे सहमहासंचालक मनीष कुमार यांनी एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना यासाठी जबाबदार धरले आहे.
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




