उल्हासनगर: महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आता इंग्रजी माध्यमातून मोफत किंवा अत्यंत अल्पदरात दर्जेदार शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या विविध शाळांमध्ये आता इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यास शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. महापौर अश्विनी निकम, शिंदेसेनेचे गटनेते अरुण आशान आणि शिक्षण विभागाच्या सभापती साक्षी सुर्वे यांच्या सततच्या आणि यशस्वी पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे शहरातील गोरगरीब पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने पूर्वीपासून मराठी, हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या शाळांचे संचालन केले जात होते. परंतु, मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या अभावामुळे आणि पालकांचा ओढा वाढल्यामुळे सिंधी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या होत्या, तर गुजराती माध्यमाची एकमेव शाळादेखील शेवटची घटka मोजत होती. याशिवाय, मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्याही झपाट्याने कमी होत चालली होती. आजच्या स्पर्धात्मक युगात पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे; परंतु खासगी इंग्रजी शाळांची अवाढव्य आणि भरमसाठ फी परवडत नसल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नव्हते.
हीच गंभीर सामाजिक अडचण लक्षात घेऊन महापौर अश्विनी निकम आणि शिंदेसेनेचे गटनेते अरुण आशान यांनी महापालिका शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाकडे सातत्याने आणि पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या अधिकृत शासकीय पत्रानुसार, महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
या मंजुरीनुसार, महापालिका शाळा क्रमांक ११, १३, १४, २२ आणि २७ मध्ये आगामी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून इयत्ता पहिली ते चौथीचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग अधिकृतपणे सुरू करण्याच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळाली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मनपा शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना आता इंग्रजी माध्यमातून दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
दरम्यान, शासनाकडून शाळा सुरू करण्यास मंजुरी मिळाली असली, तरी आता महापालिका प्रशासनाला या निर्णयाची जलदगतीने अंमलबजावणी करावी लागणार आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी आवश्यक आणि तज्ज्ञ इंग्रजी शिक्षक, अत्याधुनिक वर्गखोल्या, डिजिटल सुविधा आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांची पूर्तता प्रशासनाकडून कधीपर्यंत केली जाते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
महाराष्ट्र
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- महाराष्ट्र: लोकसहभागातून जलसंधारणाला वेग; चार गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




