Grand Welcome Of Ayush Mhatre U19 WC Winner CaptainImage Credit source: ANI And Bcci X Account
भारतीय क्रिकेट संघाने विरारकर आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी इंग्लंडवर एकतर्फी फरकाने मात करत अंडर 19 वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची अंडर 19 वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याची ही सहावी वेळ ठरली. युवा भारतीय संघाचं या ऐतिहासिक विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. या ऐतिहासिक विजयाच्या 2 दिवसानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले. यावेळेस आयुष म्हात्रे आणि वर्ल्ड कप संघातील इतर खेळाडूंचं मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं.
आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर आणि क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली. तसेच आपल्या वर्ल्ड चॅम्पियन मुलांचं स्वागत करण्यासाठी आयुष आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा याचे कुटुंबिय विमानतळावर उपस्थित होते. आयुषचं विमानतळावर आगमन होताचं त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आयुष आणि इतर सहकारी या अशा स्वागताने भारावून गेले होते. आयुषने या स्वागतानंतर माध्यमांसह संवाद साधला. आयुषने काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात.
कॅप्टन आयुष काय म्हणाला?
“खूप चांगल वाटतंय. देवाची कृपया आहे त्याने जिंकवलं”, असं म्हणत आयुषने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या विजयासाठी आभार मानत आयुषने देवाला याचं श्रेय दिलं. तसेच आयुषने माध्यमांसह बोलताना सिनिअर टीम इंडियासाठी खेळायचं ध्येय असल्याचं बोलून दाखवलं.
प्रत्येक क्रिकेटपटूचं देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न असतं. आयुषचंही इतर खेळाडूंप्रमाणेच देशासाठीच खेळायचं स्वप्न आहे. आयुषने त्याच्या नेतृत्वात भारताला वर्ल्ड कप जिंकवला. आता आयुषने पुढे काय करायचं ठरवलंय हे त्याने माध्यमांसह बोलताना सांगितलं. “आत्ता देशासाठी खेळायच आहे”, असं म्हणत आयुषने आपली इच्छा बोलून दाखवली.
मुंबईत भारतीय संघाचं जंगी स्वागत
[embedded content]
इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा
दरम्यान टीम इंडियाने अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी याने ऐतिहासिक खेळी केली. वैभवने 175 धावां केल्या. तर आयुषने 53 धावांचं योगदान दिलं होतं. भारताने या जोरावर 50 ओव्हरमध्ये 411 धावांचा डोंगर उभा केला होता. इंग्लंडने प्रत्युत्तरात केलेब फाल्कनर याच्या 115 आणि बेन डॉकिन्सच्या 66 धावांच्या जोरावर झुंज दिली. मात्र 412 धावांच्या महाकाय आव्हानासमोर इंग्लंड अपयशी ठरली. भारताने इंग्लंडला 40.2 ओव्हरमध्ये 311 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह 100 धावांनी सामना जिंकत वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




