तुम्ही विचार करू शकता की यात नवीन काय आहे? एखादी विश्लेषक व्यक्ती असा तर्क देऊ शकते की मॅन्युफॅक्चरिंग, विशेषतः कमी मार्जिन असलेल्या कंझ्युमर-गुड्स बिझनेसकडे हाय-स्पीड प्रोडक्शनशिवाय दुसरा कोणताही खास पर्याय नाही. दर 15 सेकंदाला एक युनिट बनवणे कदाचित गरजेचे आहे. आणि मग या एआय-डॉमिनेटेड वातावरणात माणसासाठी काम करणे किती रंजक असू शकते? पण हे तितकेही कंटाळवाणे नाही, जितका तुम्ही विचार करत आहात. 8 तासांच्या शिफ्टमध्ये एखाद्या व्यक्तीला गतिमान आणि केंद्रित राहावे लागते, पण त्याचे काम वारंवार त्याच शारीरिक हालचालींची पुनरावृत्ती करणे असेलच असे नाही. वर सांगितलेल्या फॅक्टरीचेच उदाहरण घ्या. कॅमेऱ्याने कोणतीही गडबड पकडली, जसे गॅस्केट योग्य जागी लागले नसेल तर एआय-ड्रिव्हन इन्स्पेक्शन सिस्टिम तात्काळ असेंब्ली लाइन थांबवू शकते आणि रॉक म्युझिक वाजवून मानवी सुपरवायझर्सना अलर्ट करू शकते. यामुळे कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाते. कर्मचारी आता कन्व्हेयर बेल्टकडे विचार न करता पाहत राहणारे लोक राहिलेले नाहीत. ते एका डायनॅमिक सिस्टिमचे ॲक्टिव्ह फर्स्ट रिस्पाँडर बनले आहेत. ते वेगाने ‘रोबोट रँगलर्स’ बनत आहेत- ते लोक जे रोबोटिक सेल्सवर देखरेख करतात, सिस्टिमवर नजर ठेवतात, तांत्रिक अडचणी दूर करतात आणि मशीन्सच्या परफॉर्मन्सला ऑप्टिमाइज करतात. बदल हा आहे की, आता रिपिटेटिव्ह काम करण्याऐवजी हे काम करणाऱ्या टेक्नॉलॉजीला मॅनेज करायचे आहे. ते दिवस गेले, जेव्हा कर्मचाऱ्यांना तासन््तास जड मेटल चेसिस उचलावी लागायची किंवा थकवणाऱ्या विचित्र रिस्ट-मूव्हमेंट्स कराव्या लागायच्या. जेव्हा मशीन्स फिजिकल स्ट्रेनचा मोठा हिस्सा सांभाळून घेतात तेव्हा माणूस मानसिकरीत्या जास्त सतर्क राहू शकतो आणि समस्यांचे विश्लेषण करून निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. आधुनिक प्लँट्समध्ये फ्लेक्सिबिलिटीचीही जास्त गरज असेल. कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या स्टेशन्स आणि जबाबदाऱ्यांमध्ये रोटेट केले जाऊ शकते. सकाळी ऑटोमेटेड ग्लास-कुकटॉप असेंब्ली सेल सांभाळणारा वर्कर दुपारी ऑटोनॉमस मटेरियल-हँडलिंग व्हेइकल्सवर देखरेख करू शकतो. इथेच 2030 चा जॉब सिनेरिओ रंजक होऊन जातो. भविष्यातील फॅक्टरीला टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम सॉल्व्हरची गरज असेल तर तुम्ही आज काय केले पाहिजे- जर तुम्हाला 2030 मध्ये अशा फॅक्टरीजचा हिस्सा बनायचे असेल तर. 1. एआय आणि ऑटोमेशनचे बेसिक्स शिका. तुम्हाला एआय सायंटिस्ट बनण्याची गरज नाही, पण सेन्सर, मशीन व्हिजन, रोबोटिक्स, ऑटोमेशन सिस्टिम आणि एआय-बेस्ड डिसिजन-मेकिंग कसे काम करतात हे समजायला हवे.
2. डेटा लिटरसी विकसित करा. कोणत्याही फ्यूचर वर्करला डॅशबोर्ड वाचणे, बेसिक स्टॅटिस्टिक्स समजणे, असामान्य पॅटर्न ओळखणे आणि निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर करणे यात सहज असावे लागेल. एखाद्या मशीनने सांगितले की काहीतरी गडबड झाली आहे तर इंजिनिअरची वाट पाहण्याऐवजी त्या माहितीचा अर्थ काय आहे हे वर्करला समजले पाहिजे.
3. पायथन, पीएलसी प्रोग्रामिंग, रोबोटिक्स सॉफ्टवेअर किंवा इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टिम्सचे प्राथमिक ज्ञानदेखील एखाद्या वर्करला ऑटोमेटेड फॅक्टरीमध्ये अधिक मौल्यवान बनवू शकते.
4. ट्रबलशूटिंग आणि प्रॉब्लेम-सॉल्व्हिंग स्किल्स मजबूत करा. मशीन एखाद्या गडबडीला ओळखू शकते, पण तरीही माणसांची गरज भासेलच- असे का झाले, पुढे काय करायचे आणि असे पुन्हा होऊ नये हे समजून घेण्यासाठी.
फंडा असा आहे की, 2030 पर्यंत सर्वात जास्त एम्प्लॉयबल फॅक्टरी वर्कर कदाचित ती व्यक्ती नसेल, जी हातांनी वेगाने काम करू शकेल. ती अशी व्यक्ती असू शकते, जी मशीनला समजू शकेल, तिच्या डेटावर प्रश्न उपस्थित करू शकेल, तिच्यातील बिघाड दुरुस्त करू शकेल आणि तिला अधिक चांगले काम करायला शिकवू शकेल. फॅक्टरीने फ्यूचर स्मार्ट वर्करला बदलण्याआधीच त्याला स्वतःला बदलावे लागेल.
अमेरिकेतील जीई अप्लायन्सेसच्या 1.1 दशलक्ष चौरस फूट कुकिंग-अप्लायन्स प्लँटच्या असेंब्ली लाइनवर तुमचा सहकारी फिजिकल एआयचे एक रूप असू शकतो. याला दोन पायांच्या माणसासारखा रोबोट समजण्याची चूक करू नका. मी इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि फिजिकल एआयबद्दल बोलत आहे, जिथे मशीन्स आता जाणवण्यास, प्रतिक्रिया देण्यास आणि गुंतागुंतीचे फिजिकल टास्क पूर्ण करण्यास सक्षम होत आहेत. 6-ॲक्सिस असलेले रोबोटिक आर्म्स मोठा स्टोव्ह पलटतात, ग्लास कुकटॉपला मेटल फ्रेमवर चिकटवतात आणि कंट्रोल बोर्डला प्रोग्राम करतात. माणूस आणि मशीन्स एकत्र काम करत दर 15 सेकंदाला एक युनिट बनवण्याच्या शर्यतीत लागलेले आहेत. संपूर्ण ऑपरेशन मॉनिटर केले जाते आणि डेटा सातत्याने सिस्टिममधून मॅनेजर्सपर्यंत पोहोचत राहतो, जेणेकरून प्रोडक्टिव्हिटीच्या प्रत्येक शक्यतेचा पुरेपूर वापर केला जाऊ शकेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
- गोवा: कुल-मुंडकार प्रकरणांबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणांची होणार सोडवणूक!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- कोल्हापूर: कोगनोळी टोल नाक्यावरील महामार्ग रोको आंदोलन ३० तासांनंतर स्थगित; राजू शेट्टींचा साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




