
Pune : पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. चाचिवली गावाजवळ दोन महामंडळाच्या बस समोरासमोर धडकल्या असून या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी साधारण नऊच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे–कोलाड महामार्गावरील हा रस्ता वळणदार आणि घाटातील असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक मानला जातो. विशेषत: गणेशोत्सवाचा काळ असल्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन–बीड ही एसटी बस कोकणातून पुण्याकडे येत होती, तर चिंचवड–खेड ही एसटी पुण्याहून कोकणाकडे जात होती. ताम्हिणी घाटाजवळील एका तीव्र वळणावर श्रीवर्धन–बीड बसच्या चालकाचा अचानक गाडीवरचा ताबा सुटला. ब्रेक नीट लागला नाही आणि बस डोंगराच्या कडेला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याच क्षणी समोरून चिंचवड–खेड एसटी बस येत होती आणि दोन्ही गाड्यांची जोरदार धडक झाली.
अपघातानंतर तात्काळ स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी आणि महामार्गावरील इतर वाहनचालक मदतीला धावून आले. त्यांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून तातडीने पौड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार सुरू आहेत आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गणेशोत्सव काळात पुणे–कोकण मार्गावरील ताम्हिणी घाट, मुंबई–गोवा महामार्ग अशा अनेक मार्गांवर प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी वळणदार रस्ते, मुसळधार पावसामुळे ओले व घसरडे डांबरीकरण आणि वाहनांची वाढती गर्दी यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. अशा वेळी चालकांनी सावधगिरी बाळगणे आणि प्रवाशांनीही दक्ष राहणे आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!


























Subscribe to my channel




