मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:धोरणांवर नेहमीच नकारात्मक‎ बोलणे योग्य ठरणार नाही‎

प्रत्येक गोष्टीत चुका काढणाऱ्या लोकांना जेव्हा‎पंतप्रधान मोदींनी ‘नाराज फूफा’ म्हटले, तेव्हा जणू त्यांनी‎अशा लोकांची नसच ओळखली. प्रत्येक कुटुंबात असे‎लोक असतातच. ते प्रत्येक गोष्टीत तक्रार शोधून काढतात.‎साहजिकच, मोदींचा हा टोमणा व्हायरल होणारच होता.‎विरोधी नेत्यांनीही याला स्वतःचा अपमान मानला. त्यांनी‎यावर टीका करायला अजिबात वेळ लावला नाही, पण‎शेवटी ते तेच करू लागले, ज्याकडे निर्देश केला गेला‎होता. त्यांनी प्रत्येक गोष्टीची तक्रार करणे सुरू केले.‎ उदाहरणार्थ, पी. चिदंबरम यांनी नाराज होऊन सांगितले‎की, ब्रिक्सची शिखर परिषद हा वेळेचा अपव्यय होता.‎अर्थतज्ज्ञ सुरजित सिंग भल्ला हेदेखील त्यांच्याशी सहमत ‎‎दिसले. भारताने ब्रिक्स सोडून पाश्चिमात्य आघाड्यांमध्ये ‎‎सामील व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. भारताचा 7.8‎टक्के विकासदर हा खुश होण्याइतका चांगला नव्हता,‎असेही म्हटले गेले. हा विचार मांडणाऱ्या एका लेखात‎म्हटले होते की, 40 टक्के कामगार आजही कमी‎उत्पादकता असलेल्या कृषी क्षेत्रात अडकले आहेत, पण ‎‎स्वातंत्र्य काळात 80 टक्क्यांहून अधिक कामगार कृषी‎क्षेत्रात ‘अडकले’ होते, हे सांगायला लेखक विसरले.‎वास्तविक, वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे कृषी क्षेत्रात‎काम करणाऱ्यांची संख्या सतत कमी होत आहे, पण असे‎सांगणे म्हणजे पेला अर्धा भरलेला आहे, असे‎सांगण्यासारखे होईल, तर टीकाकारांना फक्त तेच पेले‎दिसतात, जे अर्धे रिकामे असतात.‎ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांवर‎दरवर्षी एक नवीन विशेषण तयार करण्याचा आरोप केला.‎मग त्यांनी त्या विशेषणांची यादीही वाचून दाखवली-‎नाराज फूफा, दिमागी नक्षल, अर्बन नक्षल, खान मार्केट‎गँग, आंदोलनजीवी इत्यादी, पण या सगळ्यात मोठे चित्र‎कुठेतरी सुटून जाते. भारतात नक्कीच अनेक समस्या‎आहेत. महापालिकांची व्यवस्था कोलमडली आहे.‎स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर भ्रष्टाचार अमर्याद‎वाढला आहे. प्राथमिक शिक्षणाची अवस्था वाईट आहे‎आणि बेरोजगारी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे.‎ पण आपण अनेक आघाड्यांवर यशही मिळवले आहे.‎टीकाकार खऱ्या समस्याही मांडतात, तेव्हा त्यांचा पूर्वग्रह‎त्यांची विश्वासार्हता कमी करतो. ‘जेफरीज’ या जागतिक‎गुंतवणूक बँकेने 9 सप्टेंबर 2026 रोजी एक अहवाल प्रसिद्ध‎केला. यात भारत सध्या ज्या नव्या औद्योगिक क्रांतीच्या‎टप्प्यातून जात आहे, तो 2030 पर्यंत सहा क्षेत्रांमध्ये मोठी‎ताकद बनेल. ही क्षेत्रे आहेत: अंतराळ, सेमीकंडक्टर, डेटा‎सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा आणि एअरोस्पेस. भारत‎आता केवळ रॉकेट लॉन्च करत नाहीये, तर तो एक मोठा‎अंतराळ उद्योग उभा करत आहे.‎ पण या अहवालामुळे चुका शोधणाऱ्यांचा दृष्टिकोन‎बदलेल, याची शक्यता कमीच आहे. अहवालात म्हटले‎आहे की, भारत आधीच जगातील बहुतांश देशांपेक्षा‎जास्त सोलार सेल बनवतो. 2030 पर्यंत संपूर्ण सोलार‎व्हॅल्यू चेनपैकी 90 टक्के काम भारतात होईल. भारत‎आधीपासूनच जगात दुचाकींचा सर्वात मोठा उत्पादक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आहे. तसेच तो कारचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक,‎सिमेंटचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि स्टीलचा‎तिसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. यासोबतच भारत‎बसचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि सॉफ्टवेअर‎सेवांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. रिअल-टाइम‎डिजिटल पेमेंटच्या बाबतीत तर तो सर्वात पुढे आहे.‎चिदंबरम, खरगे आदी नेत्यांनाही हे माहीत नाही असे नाही.‎पण ते फक्त नकारात्मक चित्र पाहण्यावरच ठाम असल्याचे‎दिसते. काँग्रेसच्या समजूतदार नेत्यांपैकी एक‎असलेल्या शशी थरूर यांनी चिदंबरम यांचे म्हणणे खोडून‎काढले. ब्रिक्सचे यजमानपद भूषवणे ही आपल्यासाठी‎मोठ्या अभिमानाची गोष्ट होती, असे ते म्हणाले. आपण‎‘ग्लोबल साऊथ’साठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध‎करून देत आहोत, पण दुर्दैवाने, थरूर अशा पक्षात आहेत,‎ज्याने त्यांच्या पूर्ण क्षमतेचा कधीही वापर केला नाही.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ भारतात अनेक समस्या आहेत, पण‎आपण बरेच यशही मिळवले आहे. अशा‎वेळी टीकाकार भारताच्या त्या खऱ्या‎समस्याही मांडतात ज्या सोडवण्याची‎गरज आहे, तेव्हा त्यांचा पूर्वग्रह त्यांची‎विश्वासार्हता कमकुवत करतो.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *