दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीशमनमोहन 2024 मध्ये म्हणाले होते की, सरकारी जमिनीवरअतिक्रमण करणे हा दरोड्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे.त्यांनी उपहासाने असेही म्हटले होते की, उद्या इंडिया गेटविकत घेऊन तिथेही अवैध घर बांधले जाऊ शकते.दिल्लीतील अवैध बांधकामे रोखण्यासाठी सर्वोच्चन्यायालयाने 2006 मध्ये देखरेख समिती स्थापन केलीहोती. पण, अतिक्रमण व अपघातांवरून एक गोष्ट स्पष्टहोते. ती म्हणजे, भ्रष्ट यंत्रणेपुढे संविधान आणि न्यायालयेदोन्ही हतबल आहेत. 2019 मध्ये न्या. अरुण मिश्रा आणिदीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने एक निरीक्षण नोंदवले होते.ते म्हणाले होते की, देशात कायद्याचे पालन करणाऱ्यांनात्रास सहन करावा लागतो. तर अवैध बांधकामकरणाऱ्यांना मात्र सवलती मिळत जातात. याच्याशीसंबंधित 4 कायदेशीर पैलू समजून घेणे गरजेचे आहे: 1. दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये इमारतीचा मालकआणि पीजी चालकाने बांधकाम केले. इमारतीचा पाया कमकुवत असल्याचे माहीत असूनही त्यांनी हे बांधकामकेले. यासाठी न्यायालयाने 81 वर्षीय निवृत्त वायुसेना अधिकारी आणि त्यांच्या 75 वर्षीय पत्नीला 14 दिवसांची कोठडी सुनावली. तीन महिन्यांपूर्वी हौजरानी येथे एका 5मजली हॉटेलला आग लागली होती. या हॉटेललाहीएमसीडीच्या अधिकाऱ्यांनीच चहाच्या दुकानाच्यानावाखाली परवाना दिला होता. त्यानंतर मंत्री आशिष सूदम्हणाले होते की, अवैध बांधकाम करणाऱ्यांना 2 वर्षांचीशिक्षा होईल. पण अवैध बांधकाम करवून घेणारेमहापालिका अधिकारी व सरकारी इमारतीतील आगीलाजबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होत नाही.
2. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 10 हजारएकर जमिनीवर अवैध कब्जा आहे. सर्वोच्च न्यायालयातदाखल केलेल्या अहवालानुसार, फरिदाबादमध्ये 780एकर वनजमिनीवर अवैध बांधकामे आहेत. दिल्लीतडीडीएच्या लँड पूलिंग क्षेत्रात 3500 हेक्टरहून अधिकजमिनीवर अवैध बांधकामे आहेत. महाराष्ट्रातील ठाण्यात2021 मध्ये एक इमारत कोसळली होती. या घटनेनंतर उच्चन्यायालयाने अवैध बांधकामांची स्वतःहून दखल घेतजनहित याचिकेवर सुनावणी केली. तत्कालीन मुख्यन्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी यासाठी राज्य सरकार वमुंबई मनपाला फटकारले होते. ते म्हणाले होते की, सरकारीजमीन ही प्रशासनाची वडिलोपार्जित संपत्ती नाही. तिथेअवैध वस्ती वसवण्याची परवानगी देता येणार नाही.
3. हरियाणामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 2600अनधिकृत वसाहतींची (कॉलनींची) चौकशी करतआहे. फेब्रुवारी 2021 मध्ये हरियाणातीलच एका दुसऱ्याप्रकरणात न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी एक निकाल दिला होता.त्यानुसार, सरकारी जमिनीवरील अवैध बांधकामनियमित केले जाऊ शकत नाही. अवैध वसाहतीवसवण्याच्या या खेळातून माफियांना मोठी कमाई होते.तसेच, नेत्यांचीही व्होटबँक मजबूत होते. भोपाळमध्ये2022 च्या सर्वेक्षणात 576 अवैध वसाहती आढळल्याहोत्या. त्यानंतर अवघ्या दीड वर्षात 300 नव्या अवैधवसाहती वसल्या. सरकारने इशारा दिला होता की, अवैधवसाहती उभारणाऱ्यांवर ‘रासुका’ लावण्यात येईल.
4. नवी दिल्लीतील ल्युटियन्स बंगला झोनच्यानियमांनुसार, जुन्या बंगल्यांवर नवे मजले बांधता येतनाहीत. पण, त्याच भागात नवीन संसद भवन, सचिवालय,पोलिस मुख्यालय, भारत मंडपम यांसारख्या व्हीआयपीइमारतींचे बांधकाम झाले. खासदार आणि मंत्र्यांच्याबंगल्यांचा विस्तार करण्यात आला आहे. अवैधबांधकामांच्या छोट्या प्रकरणांमध्ये दंड आकारून तेनियमित करायला हवे. यामुळे भ्रष्टाचारात घट होईलआणि जनतेचा छळही थांबेल. सरकारी जमिनीवरीलअतिक्रमणे व संघटित माफियांना जबाबदार असणाऱ्यायंत्रणेची जबाबदारी निश्चित होणे अत्यंत गरजेचे आहे.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अवैध बांधकाम करणाऱ्यांना तर शिक्षाहोते. पण, अवैध बांधकाम करवूनघेणाऱ्यांवर आणि अपघातांना जबाबदारअसणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होतनाही. मोठ्या अपघातानंतर छोट्यालोकांना तुरुंगात पाठवायचे व बड्यांनावाचवायचे, हा खेळ थांबायला हवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

वारजेत नुकताच डांबर टाकलेला रस्ता हातानेच निघाला; निकृष्ट कामाचा VIDEO समोर!
रिक्षाचालकाने लक्झरी ट्रॅव्हल्सची चावी घेतली; वाकडमध्ये वाहतूक कोंडी!
हत्तीच्या पोटाखाली बसून चक्क ‘तीन पत्ती’चा डाव; VIDEO व्हायरल!
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान

























Subscribe to my channel


