हवामान बदल ही मानवजातीने स्वतःसाठीच निर्माणकेलेली सर्वात गंभीर समस्या आहे. तापमान वाढत आहे.पावसाचे स्वरूप बदलत आहे. तसेच, नैसर्गिक आपत्तींमुळेजगभरात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यावर मातकरण्यासाठी सरकारे धोरणे आखत आहेत. उद्योग नवीनतंत्रज्ञान विकसित करत आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढतआहे आणि झाडेही लावली जात आहेत. असे असूनहीजागतिक तापमानवाढ सातत्याने सुरूच आहे. आपण कुठेचुकत आहोत? आपल्याला केवळ उपायांची नव्हे, तर यासमस्येच्या सखोल आकलनाचीही गरज आहे. यालेखात वेगवेगळ्या काळातील आणि पार्श्वभूमीतील 4व्यक्तींनी मांडलेले 4 विचार दिले आहेत. आपण कुठे चुकतआहोत व हवामान सुधारण्याची योग्य दिशा कोणती असूशकते, हे समजून घेण्यास ते आपल्याला मदत करतील. सौदी अरेबियाचे माजी तेल मंत्री शेख अहमद झाकीयमानी म्हणाले होते, “दगडांच्या कमतरतेमुळे अश्मयुगसंपले नव्हते. त्याचप्रमाणे, जगातले तेल संपण्याच्या खूपआधीच तेल युग (पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे युग)संपुष्टात येईल.” हवामान बदलाच्या संदर्भात याचा अर्थअत्यंत स्पष्ट आहे. कोळसा, पेट्रोल आणि गॅस संपण्याचीआपण वाट पाहू शकत नाही. त्यांचा वापर आपण कमीकरायला हवा आणि शेवटी तो बंदच करायला हवा. कारण,हे इंधन जाळल्यामुळे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइडपृथ्वीला सातत्याने उष्ण करत आहे. तेल युग कधी संपवायला हवे, याबाबत अमेरिकेचे माजीराष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे एक प्रसिद्ध विधान आहे-“हवामान बदलाचे परिणाम अनुभवणारी आपली पहिलीपिढी आहे. आणि यावर काहीतरी ठोस उपाययोजना करूशकणारी आपली शेवटची पिढी आहे.” म्हणजेच, हवामानबदल ही आता केवळ येणाऱ्या पिढ्यांची समस्या राहिलेलीनाही. आपल्याला आता, याच क्षणी आणि प्राधान्याने यावरकारवाई करावी लागेल. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाले होते, “ज्यापातळीवरील जाणिवेने एखादी समस्या निर्माण केली आहे,त्याच पातळीवरील जाणिवेने ती समस्या सोडवता येतनाही.” अधिक उत्पादन, अधिक उपभोग आणि सातत्यपूर्णआर्थिक वाढ या गोष्टींना आपण प्रगतीचा पाया मानले.याचमुळे आज हवामान बदल झाला आहे. त्यांच्या मते,आपण केवळ जास्त सौर ऊर्जा, अधिक इलेक्ट्रिक वाहनेकिंवा नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे ही समस्या सोडवू शकतनाही. आपल्याला वेगळ्या दिशेने विचार करावा लागेल. योग्य दिशा ठरवण्यासाठी महात्मा गांधींचा एक प्रसिद्धविचार बहुधा सर्वात महत्त्वाचा आहे. “पृथ्वीवर प्रत्येकमाणसाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत,परंतु प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाहीत.” पृथ्वीमर्यादित आहे. तिची जमीन, पाणी, जंगले आणि खनिजेमर्यादित आहेत. त्यामुळे आपला उपभोगही मर्यादितअसायला हवा. आपल्याला गरज आणि हाव यातीलफरक पुन्हा एकदा समजून घ्यावा लागेल. आपण अन्न,कपडे, वाहने, घरे, मोबाइल, प्रवास अशा हजारो वस्तू आणिसेवा विकत घेतो. त्यांची मागणी करतो. गाडी असो, कपडेअसोत किंवा लाइट, पंखा असो, आपल्या प्रत्येकउपभोगानेनिसर्गाचे काही ना काही नुकसान होतच असते. या 4 विचारांची सांगड घातली, तर हवामान बदलाचेकारण आणि सुधारणेची स्पष्ट दिशा दिसते. जीवाश्मइंधनाचा वापर थांबवा.आत्ताच कारवाई करा. आपलाविचार बदला. उपभोग मर्यादित करा. तसेच, जीवन आणिव्यवस्था जिथे शक्य असेल तिथे लहान बनवा. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

वारजेत नुकताच डांबर टाकलेला रस्ता हातानेच निघाला; निकृष्ट कामाचा VIDEO समोर!
रिक्षाचालकाने लक्झरी ट्रॅव्हल्सची चावी घेतली; वाकडमध्ये वाहतूक कोंडी!
हत्तीच्या पोटाखाली बसून चक्क ‘तीन पत्ती’चा डाव; VIDEO व्हायरल!
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


