ठाणेकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती आता बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार (Ready Reckoner Rates) निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता हे घर अवघ्या ४४ ते ४६ लाख रुपयांत नागरिकांना उपलब्ध होणार असून, यापूर्वीच्या सोडतीमधील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवून उर्वरित घरांसाठी नव्याने लॉटरी काढली जाणार आहे.
नेमका वाद आणि पार्श्वभूमी:
-
दरांमध्ये तफावत: म्हाडाने विकसित केलेल्या चितळसर-मानपाडा येथील गृहप्रकल्पातील १,१७३ घरांपैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी काढण्यात आली होती. या प्रकल्पातील घरांना २०२०-२१ मध्ये अंशतः भोगवटा प्रमाणपत्र (Partial OC) मिळाल्यामुळे तेव्हा घरांचे दर १० हजार रुपये प्रति चौरस फूट म्हणजेच सुमारे ४४ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते.
-
पूर्ण भोगवटा प्रमाणपत्राचा मुद्दा: मात्र, या प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र (Full OC) २०२५-२६ मध्ये मिळाल्यामुळे उर्वरित घरांच्या किमती वाढवून ५१ ते ५२ लाखांपर्यंत नेण्यात आल्या. यामुळे एकाच इमारतीत आणि सारख्याच क्षेत्रफळाच्या घरांसाठी वेगवेगळ्या किमती आकारल्या जात असल्याने नागरिकांमध्ये आणि अर्जदारांमध्ये मोठा संभ्रम व नाराजी होती. दरांमध्ये मोठी तफावत असल्यामुळे याविरोधात म्हाडा कार्यालयाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद्यांची उच्चस्तरीय बैठक व आदेश:
-
वाढलेल्या किमतींमुळे आणि नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखл घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हाडाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
-
एकसमान दर धोरण: एकाच इमारतीत समान क्षेत्रफळाच्या फ्लॅट्ससाठी वेगवेगळे दर आकारणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरसकट २०२०-२१ चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून किंमत आकारण्याचे निर्देश दिले.
-
४३४ लाभार्थ्यांना दिलासा व नवीन लॉटरी: यापूर्वीच्या सोडतीमध्ये ज्या ४३४ लाभार्थ्यांनी आपली स्वीकृती पत्रे (Acceptance Letters) म्हाडाकडे जमा केली आहेत, त्यांना यासवलतीचा व जुन्या दराचा लाभ देऊन कायम ठेवण्यात यावे. तर उर्वरित घरांसाठी सुधारित व कमी केलेल्या दरांनुसार (२०२०-२१ च्या रेडी रेकनरप्रमाणे ४४ ते ४६ लाख रुपये) नव्याने लॉटरी काढण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




