मुंबई: रोहित पवारांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनातून रोहित पवारांकडून सातत्याने कठोर शब्दात सरकारवर टीका केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवर कारवाई करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानंतरही आंदोलकांकडून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी ठामपणे केली जात आहे. दरम्यान, काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना संबोधित केले होते आणि ७० हजार नोकरभरतीवरून आपली रोखठोक भूमिका मांडली होती. या घडामोडींवरून आता भाजप नेते नवनाथ बन यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर अतिशय आक्रमक शब्दांत जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजप नेते नवनाथ बन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांच्यावर चौफेर टीका केली. ते म्हणाले, "एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवायचे झाल्यास त्यांना राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा लागतो. रोहित पवारांनी आधी संविधानाचा अभ्यास करावा. रोहित पवारांचे काम फक्त अफवा पसरवण्याचे असून त्यांचे स्वतःचे असे कोणतेही कर्तृत्व नाही. ते केवळ आजोबा मुख्यमंत्री होते म्हणून आमदार झाले आहेत, जर ते नसते तर रोहित पवारांना ग्रामपंचायतचे सदस्यही कोणी केले नसते. रोहित पवार हे आपल्या राजकीय अहंकारासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन पेटवत आहेत आणि खोटे बोलण्याचे काम करत आहेत."
आगे बोलताना नवनाथ बन यांनी दावा केला की, "काल राज ठाकरेंनी रोहित पवारांच्या आंदोलनात जाऊन त्यांचे बिंग फोडले आहे. राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, आयोगाच्या अध्यक्षांना सहजासहजी हटवता येत नाही कारण त्यासाठी १९५० चा कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार त्यांना संरक्षण मिळते. राज ठाकरेंनी सर्वांसमोर हे उघड केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आंदोलनात विद्यार्थ्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळेच आता रोहित पवारांना बारामती ॲग्रोचे कार्यकर्ते आणि बाहेरून माणसे आयात करावी लागली आहेत."
रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, "रोहित पवार माझ्यावर विविध प्रकारच्या वैयक्तिक टीका करतात आणि मी भूंकतो असे म्हणतात, परंतु त्यांची स्वतःची कोल्हेकुई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांनी उद्योगपतींच्या चरणी आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे. बारामतीत जेव्हा अदानी आले होते, तेव्हा त्यांचे वाहन चालवताना ते स्वतः ड्रायव्हर बनले होते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. ते मला सोशल मीडियावरील कमेंट्स वाचण्यास सांगतात, पण त्यांनी स्वतः मला ट्रोल करण्यासाठी २ कोटी रुपयांचे बजेट ठेवून ट्रोलधाड लावली आहे. मात्र, मी असल्या ट्रोलिंगला कधीही घाबरत नाही. मी भाजपचा कार्यकर्ता असून त्याआधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) बीडमध्ये काम केले आहे. आजोबांच्या जीवावर आमदार झालेल्यांनी आमच्यावर किंवा पक्षावर टीका करू नये," असा पलटवार नवनाथ बन यांनी केला.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- बीड: परळीत मोकाट कुत्र्यांचा थरार! अवघ्या ४८ तासांत २३ जणांना लचके तोडले, नागरिकांत दहशत!
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!






















Subscribe to my channel



