कोल्हापूर: महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि कामगार कायद्यात करण्यात आलेल्या बदलांना तीव्र विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापूर शहरात एक विशाल इशारा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये राज्यातील सुमारे १५ हजारहून अधिक साखर कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामगार कायद्यामध्ये करण्यात आलेले अयोग्य बदल रद्द करावेत आणि १९९७ चा बीआयआर ॲक्ट (BIR Act) पूर्ववत लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
ऐतिहासिक बिंदू चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला मोर्चा सकाळच्या सुमारास कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकातून या विराट मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा विविध मार्गांवरून घोषणाबाजी करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. कामगारांच्या हातात मागण्यांचे फलक होते आणि शासनाच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. मोर्चा संपल्यानंतर कामगारांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
साखर कामगारांच्या प्रमुख मागण्या:
-
बीआयआर ॲक्ट (BIR Act) कायदा: १९९७ सालचा बीआयआर ॲक्ट रद्द करण्याचा किंवा त्यात केलेले अयोग्य बदल मागे घेण्यात यावेत आणि तो जुन्या स्वरूपात पूर्ववत लागू करण्यात यावा.
-
समान वेतन: साखर उद्योगात कंत्राटी पद्धतीने आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच समान वेतन आणि योग्य वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
-
थकीत वेतन: राज्यातील विविध साखर कारखान्यांमधील कामगारांचे प्रलंबित आणि थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात यावे.
-
बंद कारखाने सुरू करणे: आर्थिक अडचणींमुळे व इतर कारणांमुळे बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात यावेत, जेणेकरून कामगारांच्या रोजगाराचा आणि उत्पन्नाचा प्रश्न सुट Lशकेल.
-
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ: साखर कारखानदारीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी साखरेच्या किमान विक्री हमीभावात (MSP) प्रति किलो ५० रुपयांची वाढ करण्यात यावी.
२२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस राऊसो पाटील यांनी प्रशासनाला आणि शासनाला स्पष्ट चेतावनी दिली आहे. जर शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आगामी २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व साखर कामगार बेमुदत संप पुकारतील. या संपकाळात राज्यातील एकाही साखर कारखान्याला कामकाज किंवा गळाम हंगाम सुरू करू दिला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात संघटनेचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, रवींद्र चव्हाण, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, सचिव संतोष मोरबाळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील तसेच साखर कारखाना महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष डी. एम. निमसे यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने साखर कामगार उपस्थित होते. ऐन गाळप हंगाम तोंडावर असताना कामगारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि संभाव्य संपामुळे राज्यातील साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
शहर
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
महाराष्ट्र
- कोल्हापूर: बाळूमामा देवस्थान ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणी मोठा खुलासा; एसआयटीकडून सहावा एजंट सागर पाटील अटकेत!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
- नवी दिल्ली: 'इंडिया' आघाडीत अंतर्गत वाद उफाळला! तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्या राहुल गांधींवर जुन्या मित्रपक्षाचीच कडक टीका; म्हणाले, "तुम्ही दुतोंडी आहात"























Subscribe to my channel



