जगात सतत सुरू असलेले संघर्ष आपल्याला काहीशिकवण देत आहेत का? कदाचित हो! या संघर्षांनी सर्वातमोठा धडा हाच दिला आहे की, या जगाला फक्त लीडर्सनकोत, तर असे लीडर्स हवे आहेत जे आध्यात्मिकबुद्धिमत्तेने परिपूर्ण असतील. आणि त्यांच्यात हा विश्वासहीअसायला हवा की राष्ट्राची शक्ती केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेतूनयेत नाही, तर अशा नेतृत्वातून येते, जे लीडरलाजनसामान्यांपर्यंत आध्यात्मिक शक्ती पोहोचवण्याचीजबाबदारीही देते. युवाल नोआ हरारी सांगतात की, 21 व्याशतकात आध्यात्मिकता पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे,कारण या काळात अनेक आध्यात्मिक आणि दार्शनिकप्रश्न अचानक व्यावहारिक प्रश्न बनत चालले आहेत.त्यांच्या मते, आज युद्धाच्या संकटात ते सर्व प्रश्न जेकधीकाळी तत्त्वज्ञानाशी संबंधित होते, ते आता खूपमहत्त्वाचे झाले आहेत आणि आपल्याला अशा वळणावरआणून सोडत आहेत, जिथे मानव स्वतः मानवाला पुन्हाडिझाइन करू शकतो. आज या जगाला आध्यात्मिकनेतृत्वाची सर्वाधिक गरज आहे, कारण जग पुन्हा विचारूलागले आहे की बॉम्ब शाळांवर का पडतात, गरीब आणखीगरीब का होत आहेत, फ्री-विल काय असते, माणूसअसण्याचा अर्थ काय आणि माणुसकी काय आहे? हरारीही बाब थेट त्या कंपन्यांशी जोडतात, ज्या आपल्याभविष्याला आकार देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे कीटेक-कंपन्यांनाही खरोखरच तत्त्वज्ञांची गरज आहे. त्यांनाअध्यात्माच्या जाणकारांची आवश्यकता आहे, जेणेकरून तेनेमके काय करत आहेत हे त्यांना समजू शकेल.आध्यात्मिक नेतृत्वच तो विश्वास प्रस्थापित करते, जोआजच्या जगात दिवसेंदिवस तुटत चालला आहे. या युद्धांनी सर्वात मोठी शिकवण ही दिली आहे की तमामकरार आणि तहांनंतरही राष्ट्रांमध्ये तो विश्वास उरलेला नाही.ज्या आर्थिक अवलंबित्वावर जग टिकून होते, तेदेखील युद्धेरोखू शकले नाही आणि सर्व आंतरराष्ट्रीय संस्थाही युद्धरोखण्यात अपयशी ठरल्या. कारण आध्यात्मिकलीडरशिपचे नेतृत्व करणारे लीडर्सच त्यांना मिळू शकलेनाहीत. तो हरवलेला विश्वास फक्त असेच नेतृत्व परतआणू शकते, ज्याच्या प्रतिमेत कोणतेही लपलेले युद्ध नसेल,कोणतीही डोकावणारी क्रूरता नसेल, तर तो शांतता आणिसाधनेचा नायक असेल, जो जगाला वाचवण्याचासर्वतोपरी प्रयत्न करेल. आज आपल्याला अशा“स्पिरिचुअल कोशेंट’ ची गरज आहे, जो जगालावाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. आणि या जगालाकोणत्याही पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये विभागले जाऊदेणार नाही. आज एकीकडे एआयपासून मानवतेलावाचवण्याची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडेसर्वसामान्यांमध्ये नेतृत्वाविषयीचा तो विश्वासही तुटतचालला आहे, जो कोणत्याही समाजाला आणि देशालाघडवतो आणि वाचवतोही. सर्व राष्ट्रे जणू एखादा राजकीयआखाडा बनत चालली आहेत, जिथे कोणतेही नाते किंवाओळख या गोष्टीवर अवलंबून असते की कुणाची राजकीयबांधिलकी काय आहे? कोण पक्षात आहे तर कोणविरोधात आहे? पश्चिम आशियातील संघर्षामध्येही हेचपाहायला मिळाले की आपला स्वार्थ साधण्यासाठीजगातील देश शस्त्रे तर विकू शकतात, पण युद्ध रोखण्याचाकोणताही प्रयत्न करू इच्छित नाहीत. कारण तिथेही तमामराष्ट्रांमध्ये एक पक्ष आणि विरोधी पक्ष निर्माण झालेलाअसतो. जगाला असे लीडर हवे आहेत, जे प्रेम आणिसलोख्याने जगायला शिकवतील. आध्यात्मिक लीडरशिपजनतेला आत्मिक शक्तीने परिपूर्ण करते. ती नेतृत्वाला त्याअहंकारापासून वाचवते, जो जगाला शस्त्रांनी जिंकू पाहतोआणि कधीही न संपणाऱ्या संघर्षात लोटून देतो. ज्यामध्येपश्चात्ताप करण्याचीही संधी नसते. कोविडनंतर युद्धांमध्येबुडालेले जग आता त्या आध्यात्मिक लीडरशिपला सादघालत आहे, जी आपल्याला जीवनाच्या होर्मुझमधूनसुरक्षित बाहेर काढण्यास सक्षम असेल! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: शरद पवार गटाला खिंडार! तीन आजी-माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी; तुकाराम मुंढेंचे नवे नियम कुणाला लागू होणार?
कोथरूडमध्ये भरधाव कारची दुचाकींना धडक! नागरिकांनी चालकाला पकडलं
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची फडणवीसांकडे मोठी मागणी; दिवाळीपूर्वी हेक्टरी ₹१ लाख मदत द्या!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!




























Subscribe to my channel




