कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!

कोल्हापूर: जिल्ह्यातून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेची सभागृह अस्तित्वात येऊन जवळपास सात ते आठ महिने झाले असले, तरी विरोधी राहू द्या, पण थेट सत्ताधारी सदस्यांनाही विकासकामांसाठी रुपयाचाही निधी मिळालेला नाही, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधान परिषद आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. वेळेत आणि अपेक्षित निधी मिळत नसल्यामुळे महायुतीच्या स्थानिक सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप होत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

कोल्हापुतातील एका पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकार आणि स्थानिक आमदारांच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, अपेक्षित आणि हक्काचा निधी मिळत नसल्यामुळे केवळ विरोधीच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्येही तीव्र असंतोष खदखदत आहे. याविषयी विरोधी सदस्यांसह सत्ताधारी अशा तब्बल ५१ सदस्यांनी एकत्र येऊन अधिकृतपणे निवेदन दिले आहे. निधी वाटपात होत असलेल्या दुजाभावामुळे महायुतीच्या सदस्यांना आता 'आपण सत्तेत येऊन चूक केली की काय?' अशी भावना निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलताना सतेज पाटील यांनी आरोप केला की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या हक्काचा हा निधी सामान्य सदस्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी महायुतीचे १० आमदारच स्वतःकडे हिसकावून घेत आहेत. जर सर्व निधी आमदारच स्वतःसोबत घेऊन जात असतील, तर स्थानिक सदस्यांनी नेमका कोणता विकास करायचा आणि जनतेला काय उत्तर द्यायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच महापालिकेच्या राजकारणाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, महापालिकेत महायुतीमध्ये नक्की काय सुरू आहे, हे संपूर्ण शहर आणि जिल्हा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान आता नेहमी महापालिका चौकात पोलिस बंदोबस्त मागवण्याची वेळ आयुक्तांवर आली आहे. महायुतीच्या नगरसेवकांमध्ये वारंवार होणारे अंतर्गत वाद आणि कलगीतुरा जिल्ह्यासमोर उघड होत असून, सत्तेत असूनही सुसंवाद नसल्याची टीका त्यांनी केली. सतेज पाटील यांच्या या विधानामुळे कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून महायुतीमधील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!”

  1. What is the ingredient of a facial creamTeen nylons ann angelMy large cockSweaty
    hairy assholesOnline dating service for gayHot chat roullete nude girlSleeping breast
    xnxx Naked babes andcarsCeleb pussy pictsEbny porn sitesFamous cartoon tv
    pornAnimated desktop male stripperKathleen robertson nude freeMom loves bbc free sex storiesVaginal
    leakSexy teacher downloadFather bother daughter gangbang xnxxhealth.cc Free monster creampie porn videosStrip merchandiserClose up eat out pussyCanadian teen slutsFree bdsm cathetor and enema videosMarlyn monroe
    sexEcho vintage books & vinylBottom line accounting softwareCarolina clothing hickory north vintage
    xnxx Frontal male nude actorsPlayboy tv – sexy urban legendsWhen will market bottomWill massaging mens breast make biggerNake male linksSweatpants
    were sexy mondayAqua teen hunger force tshirtsMale oral sex machinesEscort bristol
    blackPhotos of twinks with old guysFake indian celebs nudeGirl in the red bikiniGorgeous sexy modelAlyssa milano en lingerieHas robin vernon ever been nudePunishment forceful sex
    bdsmBest things to jack off tooHot homemde porn moviesNaked women pictures for freeeNude pre tee modelsBig cock swingers

    Look at my website :: site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *