पुणे: लाडक्या बाप्पाच्या अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आणि मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी शहरात येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय टाळावी, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पुणे शहर वाहतूक शाखा आणि पुणे महानगरपालिकेच्या (PMC) वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना आपली वाहने सुरक्षितपणे उभी करता यावीत, यासाठी शहरात तब्बल २६ ठिकाणी अधिकृत पार्किंग व्यवस्था तयार करण्यात आली असून वाहनचालकांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त गाड्या न पार्क करता या विहित केलेल्या ठिकाणीच गाड्या लावाव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने जाहीर केलेल्या यादीनुसार, चार आणि दोन चाकी वाहनांसाठी खालीलप्रमाणे विविध ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे:
-
प्रमुख पार्किंग ठिकाणे: शिवाजी आखाडा पार्किंग परिसर, पत्र्या मारुती चौकाजवळ असलेले हमालवाडा, आरटीओ चौकातील (RTO Chowk) मैदान, स. प. महाविद्यालय (SP College) मैदान, निळम टॉकीज परिसर, बीएमसीसी कॉलेज (BMCC College) मैदान, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजिवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज परिसर, बीएमसीसी रोडवरील जैन हॉस्टेल मैदान, रानडे पथ, टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल आणि भिडे पूल ते गाडगीळ पुलादरम्यानचे नदीपात्रातील क्षेत्र.
-
दुचाकी वाहनांसाठी विशेष जागा: रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल, गोगटे प्रशाला, सारसबागेकडील पेशवे पार्क, सावरकर चौकातील हरजीवन हॉस्पिटल समोर, पाटील प्लेजा, तसेच पर्वती ते दंडेकर पूल, दंडेकर पूल ते गणेशमळा आणि गणेशमळा ते राजाराम पूल यादरम्यानचा परिसर, मराठवाडा कॉलेज, पेशवे पथ आदी ठिकाणी दुचाकी पार्किंगची सोय केली गेली आहे.
-
चार चाकी वाहनांसाठी: पुरम चौकाजवळील पीएमपीएल (PMPML) मैदान हे चार चाकी वाहनांच्या पार्किंगसाठी निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, यातील काही ठिकाणी (उदा. देसाई कॉलेज परिसर) केवळ पोलिसांच्या वाहनांसाठी पार्किंग राखीव ठेवण्यात आले असून नागरिकांनी रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे विशेष निर्देश पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




