Proud Moment! Jaybhawani College Student Phalke Revan Selected for Mumbai Police

पाटोदा: जय भवानी महाविद्यालयाचा विद्यार्थी फाळके रेवण याची मुंबई पोलीस दलात निवड!

Proud Moment! Jaybhawani College Student Phalke Revan Selected for Mumbai Police
पाटोदा येथील जय भवानी महाविद्यालयाचा बी.एस्सी. विद्यार्थी फाळके रेवण बंडू याने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मुंबई पोलीस भरतीत यश संपादन केले आहे. त्याची पोलीस पदावर निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयात त्याचा सत्कार आयोजित करण्यात आला. प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.

यावेळी रेवण म्हणाला,
“महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामुळे मला लेखी परीक्षेत यश मिळाले. योग्य मार्गदर्शन आणि मेहनत यामुळे हे शक्य झाले.”

प्राचार्य डॉ. कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“रेवणने स्पर्धेच्या काळात इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब जोशी यांनी केले, तर आभार प्रा. शिवाजी भोरे यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. सुनिल जाधव, प्रा. सोमनाथ घाडगे, प्रा. डॉ. बंडू लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रेवणच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *