बीड (धारूर): बीड जिल्ह्याच्या धारूरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर मद्यधुंद टोळक्याने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) बाबासाहेब भवर गंभीर जखमी झाले असून, या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी मध्यरात्री पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर आपल्या पथकासह धारूर शहराजवळील घाटपाटी परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना एक हॉटेल सुरू असल्याचे आणि काही संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांनी जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला,
तेव्हा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींनी पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. "आम्हाला कोणी काही करू शकत नाही," अशी गर्जना करत राहुल हजारी नावाच्या आरोपीने उपनिरीक्षकाचा गळा पकडून त्यांना धक्काबुक्की केली.
दगडफेक आणि दुखापत: परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. याचा राग आल्याने आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली.
यातील एक मोठा दगड थेट उपनिरीक्षक भवर यांच्या छातीला लागला, ज्यामुळे ते जखमी झाले.
दोन आरोपींना अटक: याप्रकरणी धारूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमित कांताप्रसाद तिवारी आणि सुजय गोकुळसिंग
चव्हाण या दोघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी राहुल हजारी, अमित सद्देवाल आणि मोहन रहिकवाल हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भरवस्तीत पोलिसांवरच असे हल्ले होत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा
प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
- नांदेड: डोळ्यांदेखत कारसह पत्नी वाहून गेली! नांदेडमध्ये बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नीचा शोध सुरू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?





























Subscribe to my channel




