पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठ्या मताधिक्याने पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या राजकीय उलथापालथीनंतर बॉलीवूड दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला असून त्यांच्या पराभवावर समाधान व्यक्त केले आहे.
'द बंगाल फाइल्स' वरून होता संघर्ष
'द काश्मीर फाइल्स' आणि आगामी 'द बंगाल फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर (X) एक जुना व्हिडिओ शेअर करत 'Never Again' (पुन्हा कधीही नाही) असे लिहिले आहे. अग्निहोत्री यांनी दावा केला आहे की, ममता बॅनर्जी सरकारने त्यांना बंगालमध्ये येण्यापासून रोखले होते. इतकेच नव्हे, तर 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपटही चित्रपटगृहांमधून काढून टाकण्यात आला होता आणि त्यांना राज्यात प्रवेशबंदी करण्यात आली होती.
पुरस्कार स्वीकारण्यापासून रोखल्याचा आरोप
अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गेल्या वर्षी त्यांनी 'द बंगाल फाइल्स'वर पूर्णपणे बंदी घातली होती. आमच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम उधळला गेला, माझ्यावर हल्ले झाले आणि अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या. मला माझे पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्यपालांकडेही जाऊ दिले नाही. मात्र, आम्ही हार मानली नाही आणि आमचा लढा सुरू ठेवला." निवडणुकीच्या काळात हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गुप्तपणे प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
"बंगालची जनता आता निर्भयपणे जगू शकेल"
ममता बॅनर्जींच्या पराभवाचे स्वागत करताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, हा सत्याचा मोठा विजय आहे. "बंगालच्या महान जनतेचे अभिनंदन! आता तुम्ही निर्भयपणे, मान उंचावून चालू शकता. यानंतर बंगालची जनता कोणत्याही भीतीशिवाय आपले जीवन जगू शकेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांगायचे झाल्यास, कोलकाता येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान झालेल्या तोडफोडीनंतर अग्निहोत्री आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद चांगलाच चिघळला होता. आता निकालांनंतर हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!

























Subscribe to my channel




