
Ahmedabad : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेमध्ये २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं. मात्र, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली. याच विमानाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. तसेच या विमानात असलेल्या सर्व क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.
या विमान दुर्घटनेत १२ क्रू मेंबर्स होते. या क्रू मेंबर्समध्ये निवृत्तीला काही महिने बाकी असलेल्या एका पायलटचा समावेश होता. तसेच ११ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेली एक फ्लाइट अटेंडंट, तसेच एअर इंडियामध्ये नुकतेच रुजू झालेले दोन क्रू मेंबर्स आणि अनेक तरुणींसाठी प्रेरणा असलेली पनवेलची एक तरुण फ्लाइट अटेंडंटचाही समावेश होता.
|
Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटनेत सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक अपघातग्रस्त |
अहमदाबादवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच झालेल्या अपघात एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्स पैकी एक असलेले कॅप्टन सुमित सभरवाल हे होते. सुमित सभरवाल हे गेल्या काही वर्षांपासून पायलट म्हणून काम करत होते. सभरवाल हे त्यांच्या ९० वर्षीय वडिलांबरोबर पवईतील जलवायू विहारमध्ये राहत होते. ही घटना घडल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींच्या मते सभरवाल हे काही महिन्यांनी निवृत्त होणार होते. त्यानंतर ते त्यांच्या वृद्ध वडिलांबरोबर राहणार होते.
पायलट सुमित सभरवाल यांच्याबाबत बोलताना त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, “ते खूप संयमी आणि शिस्तप्रिय होते. आम्ही त्यांना अनेकदा गणवेशात ये-जा करताना पाहायचो.” दरम्यान, सभरवाल यांच्या पाठिमागे आता त्यांची मोठी बहीण आहे, ती दिल्लीत राहते. त्यांचे दोन्ही मुलं व्यावसायिक वैमानिक आहेत. पायलट सुमित सभरवाल यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण पवईकरांना धक्का बसला आहे.
फ्लाइट अटेंडंट दीपक पाठक
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सपैकी एक बदलापूर येथील फ्लाइट अटेंडंट दीपक पाठक हे देखील होते. ११ वर्षांहून अधिक काळ एअरलाइन्समध्ये कामाचा त्यांना अनुभव होता. दीपक पाठक हे नेहमी फ्लाइट उड्डाण करण्याआधी घरी फोन करणं चुकवत नव्हते. असंच त्यांनी घटनेच्याआधीही घरी फोन केला होता. याबाबत कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, “त्याने नेहमीप्रमाणे आम्हाला फोन केला होता. पण आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की तो फोन शेवटचा ठरेल.”
सायनीता चक्रवर्ती
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये ३५ वर्षीय सायनीता चक्रवर्ती यांचाही समावेश होता. एअर इंडियातील या अपघातग्रस्त विमानामधील असलेल्या क्रूपैकी या एक होत्या. सायनीता चक्रवर्ती या जुहू कोळीवाडा येथील रहिवासी होत्या. याआधी त्या गो एअरलाईन्समध्ये काम करत होत्या. मात्र, त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एअर इंडियामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या काही नातेवाईकांनी सांगितलं की, “त्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम केले होते.”
मैथिली मोरेश्वर पाटील
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात पनवेलमधील न्हावा गावातील २४ वर्षीय फ्लाइट अटेंडंट मैथिली मोरेश्वर पाटील यांचाही समावेश होता. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर मैथिली मोरेश्वर पाटील यांच्या घरी अनेक स्थानिक जमले होते. अनेकांनी मैथिली मोरेश्वर पाटील यांच्या घरी आठवणी मांडल्या. तिने तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाची अनेकांनी आठवण करून दिली. तिला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाल्यानंतर ती त्यांच्या न्हावा गावातील असंख्य तरुणींसाठी प्रेरणा होती, असं त्यांच्या काही नातेवाईकांनी सांगितलं.
रोशनी सोनघरे
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २७ वर्षीय रोशनी राजेंद्र सोनघरे हिचाही समावेश होता. विमानात असलेल्या क्रू मेंबर्सपैकी ही एक होती. डोंबिवलीतील राजाजी पथवरील माधवी बंगला परिसरातील रहिवासी असलेल्या सोनघरे यांचे पालक आणि भाऊ यांना ही बातमी समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. एअर इंडियामध्ये नुकतीच रुजू झालेली सोनघरे ही फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. एअर होस्टेस होणं हे तिचं स्वप्न होतं, असं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं. ती डोंबिवली पूर्वेतील एका सोसायटीत तिच्या आईवडिलांबरोबर राहत होती. इंस्टाग्रामवर तिचे मोठे फॉलोअर्स होते.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




