छत्रपती संभाजीनगर: शहरातील खवय्यांसाठी अत्यंत आवडते आणि विशेषतः चवदार इमरती, जिलेबी व समोशांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमंडी परिसरातील मछलीखडक येथील ऐतिहासिक 'उत्तम उपहारगृह'वर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिठाई उत्पादक आणि हॉटेल्सविरोधात राज्यभरात विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या गुलमंडी परिसरातील मच्छली खडक येथील अतिशय जुने आणि प्रसिद्ध नाश्ता केंद्र तसेच मिठाई उत्पादक दुकान 'उत्तम उपहार गृह'वर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली. या पाहणीदरम्यान ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या तब्बल १० गंभीर त्रुटी आढळून आल्या. यानंतर प्रशासनानं कडक पाऊल उचलत या आस्थापनेचा परवाना तातडीने निलंबित केला असून दुकान पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तपासणीत उघड झालेला अस्वच्छता आणि भेसळीचा प्रकार:
१. चुकीचा परवाना घेऊन उत्पादन: मिठाई, जिलेबी आणि इमरती तयार करण्यासाठी नियमानुसार 'उत्पादक' वर्गातील परवाना आवश्यक असताना, या आस्थापनेने केवळ 'रेस्टॉरंट' या चुकीच्या श्रेणीत परवाना मिळवला होता.
२. तळण्यासाठी अत्यंत विषारी तेलाचा वापर: समोसे आणि भजी तळण्यासाठी वारंवार तेच तेल उकळले जात होते. या तेलाची चाचणी केली असता, त्याची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आढळली. आरोग्यासाठी अपायकारक असणारे हे तेल वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता.
३. पुन्हा पुन्हा उकळलेले वनस्पती तूप: जिलेबी आणि इमरती तळण्यासाठी देखील निकृष्ट दर्जाचे आणि वारंवार वापरलेले वनस्पती तूप वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले.
४. खाद्यपदार्थांच्या जागी झुरळांचा वावर: जिथे खाद्यपदार्थ बनवले जातात, तिथेच मोठ्या प्रमाणावर झुरळ फिरताना दिसले. विशेष म्हणजे, येथे कीटकनाशक फवारणी केल्याची कोणतीही नोंद आढळली नाही.
५. रंगांचा बेकायदेशीर वापर: जिलेबी आणि इतर मिठाईत आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंगांचा बेकायदेशीर आणि अमर्याद वापर केला जात होता. हे रंग किती प्रमाणात वापरावेत, याचे कोणतेही भान कामगारांना नव्हते.
६. अस्वच्छतेचे साम्राज्य आणि काळपट भिंती: दुकानाच्या भिंतींवर जाळे आणि जळमटे साचलेली होती, तर समोसे तळणाऱ्या ठिकाणी भिंतींवर तेलाचे काळे थर जमा झाले होते.
७. कामगारांची वैद्यकीय तपासणी नाही: येथे काम करणाऱ्या २५ ते ३० कामगारांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती.
८. ड्रेनेजच्या शेजारी इडलीचे पीठ: सर्वात धक्कादायक म्हणजे, इडली तयार करण्यासाठी आंबवलेले पीठ चक्क उघड्यावर आणि सांडपाण्याच्या लाईनजवळ ठेवलेले आढळले.
९. तंबाखूच्या पिचकाऱ्या: खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी कामगारांचे तंबाखूचे पुडे आढळले, तर भिंतींवर तंबाखू खाऊन थुंकल्याचे विदारक चित्र समोर आले.
१०. उघडी कचराकुंडी: कचराकुंडीवर कसलेही झाकण नव्हते, तसेच खिडक्यांना जाळ्या नसल्याने माशा आणि इतर कीटकांचा थेट वावर होता.
संशयित तेलाचे नमुने प्रयोगशाळेत रवाना:
या कारवाईनंतर पथकाने पेढीतून दूषित झालेले तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने जप्त केले असून ते अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर हॉटेल व्यावसायिक आणि मिठाई उत्पादकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




