वसई / पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि आजवरचा सर्वात विचित्र अपघात घडल्याचे समोर आले आहे. वसई तालुक्यातील कोपर फाटा येथे मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या (Mumbai-Vadodara Expressway) उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या अजस्र लोखंडी पुलाच्या (Iron Bridge) रचनेत एक भरधाव डम्पर थेट हवेत अधांतरी अडकला. हा अपघात इतका अद्भूत आणि भीषण होता की डम्परची केबिन रस्त्यावर आणि मागचा मोठा सांगाडा थेट पुलाच्या लोखंडी स्ट्रक्चरमध्ये अडकून संपूर्ण डम्पर उभा झाला होता.
चुकून दाबले गेले हायड्रोलिक सिस्टिमचे बटण
प्राथमिक माहितीनुसार, हा डम्पर महामार्गावरून अत्यंत भरधाव वेगाने चालला होता. प्रवासादरम्यान चालकाकडून नकळत किंवा तांत्रिक बिघाडामुळे डम्परच्या हायड्रोलिक सिस्टिमचे (Hydraulic System) बटण दाबले गेले. यामुळे डम्पर वेगात असतानाच त्याचा मागचा डम्परचा भाग (हौदा) हळूहळू वर उचलला गेला. डम्परचालकाच्या ही गोष्ट लक्षात येण्यापूर्वीच, वर उचलला गेलेला हा अवजड भाग कोपर फाटा येथील निर्माणाधीन लोखंडी ब्रिजला जाऊन प्रचंड वेगाने धडकला.
डम्पर हवेत लटकला; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
धडक इतकी भीषण होती की, डम्परचा मागचा भाग लोखंडी पुलाच्या खांबांमध्ये आणि गर्डरमध्ये घट्ट अडकला. वेग जास्त असल्याने डम्परचे पुढचे चाक आणि संपूर्ण इंजिनचा भाग रस्त्यापासून वर उचलला गेला आणि डम्पर थेट हवेत उभा लटकला. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. डम्पर अशा पद्धतीने मध्योमध अडकल्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेची एक लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावी लागली.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र हायवेच्या मधोमध उभ्या लटकलेल्या डम्परमुळे वाहनांच्या वेगाला ब्रेक लागला असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. डम्परला पुलाच्या लोखंडी विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि मोठ्या हायड्रोजन क्रेन पाचारण करण्यात आल्या आहेत. क्रेनच्या साहाय्याने डम्पर सुरक्षित खाली उतरवण्याचे आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ९७.९२ टक्के चुरशीने मतदान! खंडाळ्यात तुफान राडा, उद्या निघणार निकाल
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा



























Subscribe to my channel




