शालेय विद्यार्थ्यांसाठी बारावीपर्यंतचे बहुतांश उच्च शिक्षण संस्थांचे जग जवळपास अनोळखीच राहते. सामान्यपणे प्रवेशाच्या वेळीच ते प्रथमच महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या परिसरात जातात. कल्पना करा- हेच विद्यार्थी पाचवीपासून किंवा त्याही आधी महाविद्यालयांच्या परिसरात जाऊ लागले तर? तुम्ही विचाराल त्यांनी तिथे का जावे? माझे उत्तर असेल – संग्रहालय पाहण्यासाठी. महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा संग्रहालयाशी काय संबंध, असा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर पुढे आहे. तुम्ही काही शहरी मुलांना विचारले की भाज्या कुठून येतात? तर ती निरागसपणे फ्रिजकडे बोट दाखवतील किंवा सुपरमार्केटमधून अथवा विविध ॲपच्या वितरण कर्मचाऱ्यांमार्फत त्या मिळतात असे सांगतील. पण तुम्ही बेंगळुरू येथील गांधी कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या महाविद्यालयाने उभारलेले पीक संग्रहालय पाहिले तर उत्तर वेगळे असेल. हा अनुभव विद्यार्थ्यांना असे बरेच काही शिकवू शकतो. ते पाठ्यपुस्तकांनाही अजून पूर्णपणे साध्य झालेले नाही. झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे मुलांमध्ये अन्न उत्पादन व त्याच्या वापराबाबतची समज कमी होत चालली आहे हे तुम्हालाही मान्य करावे लागेल. जेवणाच्या ताटातच भाज्या पाहण्याऐवजी या संग्रहालयात मुले त्यांच्यामध्ये फिरू शकतात. ती टोमॅटोच्या रोपाला स्पर्श करू शकतात, पालेभाज्या तोडू शकतात आणि अन्न त्यांना वाटते तिथे नव्हे, तर दुसरीकडे तयार होते हे समजू शकतात. हळूहळू त्यांना कळते की अन्नाची सुरुवात माती, बियाणे, सूर्यप्रकाश, पाणी आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमातून होते. येथे विद्यार्थी अन्नाचा संपूर्ण प्रवास समजू शकतात – बियाण्यांची निवड आणि पेरणीपासून सिंचन, परागीकरण, कापणी, साठवणूक, वाहतूक आणि अखेरीस स्वयंपाकघरापर्यंत. या प्रवासात त्यांची गांडुळे, मधमाशा, कंपोस्ट खड्डे, औषधी वनस्पती आणि देशी पिकांच्या जातींशीही ओळख होते. कोणत्याही परीक्षेशिवाय हा अनुभव जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, पोषणशास्त्र आणि अर्थशास्त्र शिकवतो. आता प्रश्न असा आहे की विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी केवळ पीक संग्रहालयापुरतेच का थांबावे? एखादे अभियांत्रिकी महाविद्यालय नवोपक्रम उद्यान तयार करू शकते. तेथे विद्यार्थी सायकल चालवून वीज निर्माण करतील. छोटे पूल बांधतील, पाण्याचे पंप चालवतील, विविध उपकरणांवर प्रयोग करतील आणि प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या प्रदर्शनांमधून रोबोटिक्स समजून घेतील. तेव्हा भौतिकशास्त्र हा भीतीदायक नव्हे, तर आनंददायी विषय बनेल. एखादे वैद्यकीय महाविद्यालय हृदय, फुप्फुसे आणि मेंदू यांच्या विशाल चालत पाहता येणाऱ्या प्रतिकृती असलेले मानवी शरीर शोध केंद्र उभारू शकते. परस्परसंवादी प्रदर्शनांच्या माध्यमातून हातांची स्वच्छता, पोषण, लसीकरण, प्रथमोपचार आणि अवयवदान यांसारख्या गोष्टी शिकवता येतील. त्यामुळे रुग्णालयांची भीती वाटण्याऐवजी विद्यार्थ्यांना स्वतःचे शरीर कसे कार्य करते हे समजेल. विधी विद्यापीठे संविधान संग्रहालय उभारू शकतात. तेथे तरुण अभिरूप न्यायालय, बालसंसद आणि हक्क व कर्तव्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होतील. लोकशाहीची खरी समज प्रत्यक्ष सहभागातूनच अधिक चांगल्या प्रकारे विकसित होते. व्यवस्थापन शिक्षण संस्था उद्योजकता संग्रहालय उभारू शकतात, जे असामान्य उद्योग उभे करणाऱ्या सामान्य भारतीयांच्या कथा सांगेल. उदाहरणार्थ, रस्त्याच्या कडेला असलेले छोटे खाद्यपदार्थांचे दुकान मोठ्या उपाहारगृह साखळीत कसे रूपांतरित झाले किंवा ग्रामीण महिलांनी यशस्वी सहकारी संस्था कशा उभारल्या. येथे विद्यार्थी छोट्या उद्योगांचे व्यवस्थापन, अर्थसंकल्प तयार करणे आणि कल्पना कंपनीत कशा रूपांतरित होतात हेही शिकू शकतील. ही कल्पना नवीन नाही. अशी अनेक उदाहरणे आधीपासूनच आहेत. उदाहरणार्थ- अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एक्सप्लोरेटोरियममध्ये प्रकाश, ध्वनी, गती, मानवी वर्तन व अभियांत्रिकीशी संबंधित शेकडो परस्परसंवादी प्रदर्शने आहेत. त्यामुळे विद्यार्थी पाठांतर करण्याऐवजी प्रश्न विचारू शिकतात. ब्रिटनमधील हॅलिफॅक्स येथील राष्ट्रीय बाल संग्रहालयात अभ्यागत चौकोनी चाकांची सायकल चालवतात, भूमितीय रचना तयार करतात. विशाल कोडी सोडवतात आणि निसर्ग तसेच स्थापत्यशास्त्रात दडलेले नमुने शोधतात. गणिताला केवळ सूत्रांचा संग्रह न मानता हे संग्रहालय दाखवते की संख्या खेळ, संगीत, अभियांत्रिकी, वित्तव्यवस्था आणि दैनंदिन जीवनावर कशा परिणाम करतात. आणखी एक प्रभावी उदाहरण म्हणजे टोकियो येथील पासोना समूह. या संस्थेने जगातील सर्वांत वेगळ्या कार्यस्थळांपैकी एक उभारले आहे. त्यांच्या कार्यालयीन इमारतीत भातशेती, भाजीपाल्याच्या बागा, फळझाडे व मातीविरहित शेतीची केंद्रे उभारण्यात आली आहेत. फंडा असा की महाविद्यालयांनी असे अनुभवात्मक संग्रहालय उभारले. तेथे शालेय विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी विविध व्यावसायिकांच्या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल तर शालेय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये ही सर्वांत आवडती ठिकाणे बनतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




