मुंबई : महाराष्ट्रात शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघाती निधन झाल्यानंतर केवळ चारच दिवसात ७५ संस्थांना अल्पसंख्याकांचे प्रमाणपत्र जारी झाल्याचे उघडकीस आले आहे. अल्पसंख्याक विभागाचा प्रभार अजित पवार यांच्याकडे होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑगस्ट २०२५ पासून कोणत्याही संस्थेला प्रमाणपत्र जारी झालेले नव्हते, परंतू २८ जानेवारीनंतर अचानक संस्थांना मंजूरी दिली गेली.
२९ जानेवारी रोजी Poddar International School च्या २५ शाळांना एकाच दिवशी अल्पसंख्यांक संस्थेचा दर्जा दिला गेला. याच प्रकारे सेंट झेवियर्सच्या पाच शाळांना आणि स्वामी शांती प्रकाश आणि देवप्रकाश ट्रस्टच्या चार शाळांना देखील प्रमाणपत्र जारी केले आहे. २८ जानेवारीच्या दुपारी ३.०९ वाजता श्री माता कन्या सेवा संस्थेला प्रमाणपत्र मिळाले आणि याच दिवशी अजितदादा यांचे विमान अपघातात निधन झाले होते. निधन झाले त्या दिवशी देखील सात संस्थांना मंजूरी देण्यात आली. १ फेब्रुवारी ( रविवारी ) रोजी कोणतेही प्रमाणपत्र जारी झाले नाही, परंतू २ फेब्रुवारी रोजी पुन्हा मंजूरी मिळण्यास सुरुवात झाली. काही अनुमोदन सायंकाळी ६.४५ आणि ६.५८ वाजेपर्यंत नोंदवले गेले.
अल्पसंख्यांक दर्जा का महत्वाचा ?
शिक्षण संस्थेला अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यानंतर शाळांना अनेक नियमातून सूट मिळते.
१ – आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित नियमातून सुट मिळते.
२ – शिक्षक भरतीत अनिवार्य TET ची गरज नाही
३ – अल्पसंख्यांक कल्याण योजनांतून अतिरिक्त फंडींग
४ – दान आणि व्यवस्थापनात अधिक स्वातंत्र्य
तांत्रिक उणीवा ( खेळ मैदान आणि क्रीडा शिक्षक विवरण आदी ) कारणांनी ऑक्टोबरपासून प्रक्रिया रोखली होती. नंतर हा विभाग अजित पवार यांच्याकडे सोपविली होता. काँग्रेस नेते अक्षय जैन यांनी आरोप केला की राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुखवटा जाहीर केला असतानाही मंत्रालयात फायलींवर वेगाने निर्णय घेण्यात आले.
हा एक मोठा घोटाळा
हा “आणखी मोठा घोटाळा” असू शकतो. ते म्हणाले, “काही लोकांनी अजित पवार यांच्या मृत्यूचा फायदा घेतला. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. राज्यातील ९५% अल्पसंख्याक शाळा बोगस आहेत आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या आहेत असा दावा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला आहे.
ते म्हणाले पुढे म्हणाल की,’मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. एसआयटीने शिक्षण विभागातील ६,०००-७,००० लोकांचा सहभाग उघड केला. पण हा त्याहूनही मोठा घोटाळा आहे. आम्ही याची चौकशी करू आणि मकोका अंतर्गत कारवाई करू. मी अजित पवारांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की केवळ चांगल्या शाळांनाच प्रमाणपत्रे मिळतील. या प्रकरणाची चौकशी सीआयडीने करावी.”
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




