स्वातंत्र्यानंतर भारताविरुद्धची कोणतीही फुटीरतावादी चळवळ यशस्वी झालेली नाही. याचे श्रेय लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या साधनांबरोबरच आवश्यक परिस्थितीत राज्याने दिलेल्या ठाम प्रतिसादालाही जाते. ‘सतलज’ या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद याच संदर्भात पाहिला पाहिजे. कलात्मक स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र भारतातील सर्वाधिक रक्तरंजित दहशतवादी चळवळींपैकी एका चळवळीचा इतिहास अत्यंत निवडक स्वरूपात मांडण्याचाही अधिकार समाविष्ट आहे का? दुसरीकडे राज्याला त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा अधिकार आहे का? हे कठीण प्रश्न आहेत. कारण यात लोकशाहीच्या दोन उद्दिष्टांचा सामना होतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था तसेच राष्ट्रीय अखंडता राखण्याची जबाबदारी. एखाद्या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय अनेकदा उलट परिणाम करणारा ठरतो. डिजिटल युगात सेन्सॉरशिप क्वचितच यशस्वी ठरते. उलट बंदीमुळे अनेकदा पीडित असल्याची प्रतिमाही तयार होते. सामान्य परिस्थितीत त्यास कदाचित मर्यादित प्रेक्षक मिळाले असते, अशा चित्रपटाला अचानक ‘बंदी घातलेले सत्य’ अशी प्रतिमा मिळते आणि त्याच्या चोरट्या प्रती मोठ्या प्रमाणात पसरतात. मात्र बंदी प्रभावी ठरत नाही याचा अर्थ चित्रपटातील इतिहासाच्या मांडणीवर प्रश्नच उपस्थित करता येणार नाहीत, असा होत नाही. पंजाबमधील दहशतवाद ही भारताचे विभाजन करण्याच्या उद्देशाने चालवलेली सशस्त्र फुटीरतावादी मोहीम होती. या संघर्षात 12 हजारांहून अधिक निरपराध नागरिक, सुमारे 1,800 सुरक्षा कर्मचारी, तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे बळी गेले, तर 8 हजार दहशतवादी ठार झाले. जून 1985 मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी दहशतवाद्यांनी अटलांटिक महासागरावर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या विमानातील सर्व 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. भारताविरुद्धच्या या कटात पाकिस्तानची भूमिका होती. आयएसआयने पंजाबमधील दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण, शस्त्रे आणि निधी पुरवला होता. रेडिओ प्रसारण आणि प्रचाराच्या माध्यमातून फुटीरतावादी भावना भडकवण्याचे प्रयत्न केले जात होते. काळाच्या ओघात अनेक दहशतवादी संघटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये परिवर्तित झाल्या. खंडणीसाठी अपहरणाच्या घटना सामान्य झाल्या. जबरदस्तीने खंडणी वसूल करणे ही संघटित व्यवस्था बनली होती. व्यापाऱ्यांना तथाकथित कर भरण्यास भाग पाडले जात होते. नकार देणाऱ्यांची हत्या केली जात होती. पोलिस कर्मचाऱ्यांचीही हत्या करण्यात आली. सरकारशी संगनमत असल्याच्या संशयावरून गावांतील नेत्यांनाही ठार मारले जात होते. पंजाबमध्ये भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले होते. देश एका असामान्य परिस्थितीला सामोरा जात होता. त्याचा सामना शांततापूर्ण राजकीय मतभेद किंवा घटनात्मक आंदोलनाशी नव्हता. तो अशा संघटित सशस्त्र गटांशी लढत होता, जे दहशतीच्या माध्यमातून घटनात्मक व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी कटिबद्ध होते. मात्र, राज्यसत्तेकडून अतिरेक झाला, तिथे तिची कोणतीही जबाबदारी नव्हती, असा निष्कर्ष निघत नाही. बनावट चकमकी, सक्तीने बेपत्ता करणे आणि न्यायबाह्य हत्यांचे विश्वासार्ह आरोप पत्रकार, नागरी हक्क संघटना व न्यायालयीन चौकशांत नोंदवले गेले आहेत. घटनात्मक लोकशाहीमध्ये कायद्याचे राज्य कायमस्वरूपी स्थगित ठेवता येत नाही. प्रत्येक हत्येची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. मात्र असामान्य दहशतवादी चळवळींना तोंड देण्यासाठी अनेकदा अत्यंत कठीण कार्यकारी निर्णय घ्यावे लागतात. ब्रिटनमध्ये आयआरएविरोधातील मोहीम, स्पेनमध्ये ईटीएविरोधातील संघर्ष व श्रीलंकेत एलटीटीईविरोधातील युद्ध या सर्व लोकशाही देशांनी अशा द्वंद्वांचा सामना केला आहे. एखादा चित्रपट राज्यसत्तेच्या कथित अत्याचारांवरच लक्ष केंद्रित करतो आणि सशस्त्र दहशतवाद्यांच्या नियोजनबद्ध दहशतवादी मोहिमेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो तर तो इतिहासाचे विकृत चित्र सादर करतो. त्याचा उद्देश वस्तुनिष्ठ मांडणी करणे नसून चिथावणी देणे हा असतो. सिनेमॅटोग्राफ अधिनियम, 1952 अंतर्गत केंद्र सरकारला चित्रपट सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणित करण्याचा अधिकार आहे.. त्यात देशाचे सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडता यांसह इतर बाबींचा समावेश आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीतील मूलभूत मूल्य असले, तरी अधिनियमाच्या कलम 5बी अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था तसेच भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी कारवाई करता येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) पंजाबच्या शोकांतिकेचे कोणतेही वर्णन खलिस्तानी दहशतवाद्यांनी ठार केलेल्या हजारो निरपराध भारतीयांच्या वेदना पुसू शकत नाही. इतिहास हा ना सेन्सॉरशिपचा विषय आहे, ना निवडक स्मृतींचा. त्याला सत्याचा अधिकार आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



