१९ व्या शतकात वसाहतवादाने लष्करी शक्तीच्या जोरावर देशांना लुटले. त्यानंतर नव वसाहतवादाने लष्करी बळासोबतच आर्थिक ताकदीचा वापर करून देशांना गुलामगिरीत ढकलले. आज ट्रम्प यांचे ‘टॅरिफ साम्राज्यवाद’ आपल्यासमोर आहे. साहजिकच,भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये काही गोष्टींची देवाणघेवाण होणे अपेक्षितच होते, त्यामुळे घाईघाईने कोणताही उत्साह दाखवणे किंवा टीका करणे योग्य नाही.मात्र, या कराराचे जे तपशील समोर आले आहेत, त्यामध्ये एक चिंतेचा विषय आहे की, अमेरिका आपल्या तेल खरेदीवर नियंत्रण ठेवत आहे का? अमेरिकन सरकारने एका ‘मॉनिटरिंग कमिटी’च्या स्थापनेसाठी अध्यक्षीय आदेश ही जारी केला आहे. ही समिती भारत रशियाकडून ‘थेट किंवा अप्रत्यक्षपणे’ तेल खरेदी करणार नाही, यावर लक्ष ठेवेल. अशी कोणतीही व्यवस्था आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखीआहे. परराष्ट्रमंत्र्यांनी यावर इतकेच म्हटले आहे की,‘आमच्या पर्यायांमध्ये राष्ट्रीय हितच केंद्रस्थानी राहील, जे पुरेसा पुरवठा, रास्त दर आणि पुरवठ्याची विश्वासार्हतायावर अवलंबून असेल.’ भूतकाळातही भारताने नेहमीच आपल्या राष्ट्रीय हिताची व्याख्या ‘रणनीतिकस्वायत्ततेच्या’ संदर्भात केली आहे. याचा अर्थ जगापासून अलिप्त राहणे किंवा केवळ आदर्शवाद पाळणे असा नव्हता. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडलेल्या एका महान राष्ट्राला हा अधिकार असलाच पाहिजे की, त्याने कुणाशी व्यापार करावा, कुणाशी मैत्री ठेवावी आणि आपल्या लोकांच्या कल्याणाचे रक्षण कसे करावे. हा सिद्धांत भारताने कधीही सोडलेला नाही. प्रश्न असा आहे की, एखादा तिसरा देश एका सार्वभौमराष्ट्राला अशा सूचना देऊ शकतो का की त्याने काय खरेदीकरावे, कुणाकडून करावे, किती प्रमाणात करावे आणि कोणत्या दराने करावे? सवलतीच्या दरात तेल उपलब्ध असतानाही भारताने आपले ऊर्जा-पर्याय मर्यादित ठेवावेत असे सुचवणे, म्हणजे भारताने आपल्या सार्वभौम अधिकारांकडे दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. जर सवलतीच्या दरात तेल मिळत असेल, तर ते खरेदी करण्याचा निर्णय सर्वस्वी आपला असायला हवा. जेव्हा निर्बंध एकतर्फी लादले जातात आणि तेस्वतःच्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्यावर लादले जातात, तेव्हा ते देशांच्या ‘समान सार्वभौमत्वाच्या’संकल्पनेला तडा देतात. अशा दबावापुढे झुकणे म्हणजे त्यासत्तेचा स्वीकार करणे होय, जिथे काही देश केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही कायदे बनवतात. जे या कराराचे समर्थन करत आहेत, त्यांचा असा युक्तिवाद आहे की अमेरिकेसोबतची धोरणात्मक भागीदारी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपण ती धोक्यात आणू शकत नाही. हे निःसंशयपणे खरे आहे, परंतु भागीदारी टिकवण्यासाठी परस्पर आदर असणे आवश्यक आहे. भारताने वारंवार दाखवून दिले आहे की,तो कुणाचेही अनुकरण न करताही मजबूत संबंध ठेवू शकतो. ही स्वायत्तताच भारताला एक मौल्यवान जोडीदार बनवते, केवळ आज्ञा पाळणारा भागीदार नाही. जर आज भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबतचे निर्बंध स्वीकारले, तर उद्या संरक्षण खरेदी, तंत्रज्ञान भागीदारी किंवा अमेरिकेला न पटणाऱ्या देशांशी संबंध ठेवण्याबाबतही दबाव आणला जाऊ शकतो. एकदा का अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर बाह्य ‘व्हेटो’चा सिद्धांत स्वीकारला, तर तो मार्ग अत्यंत धोकादायक ठरेल. हा युक्तिवाद अमेरिकेसोबतच्या भागीदारीच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही विशिष्ट पुरवठादाराचा बचाव करण्यासाठीही नाही. ही मूलभूत तत्त्वांची गोष्ट आहे.भारताचे राष्ट्रीय हित तेव्हाच सुरक्षित राहते जेव्हा पर्यायांची निवड नवी दिल्लीत होते. एका स्वतंत्र देशाला आपल्या इच्छेनुसार खरेदी करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारताने वारंवार हे सिद्ध केले आहे की,कुणाच्याही दबावाखाली न येता तो जगातील विविध महासत्तांशी भक्कम संबंध ठेवू शकतो. खरं तर, ही स्वायत्तता आणि स्वतंत्र बाणाच भारताला एक मौल्यवान जोडीदार बनवतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




