- Marathi News
- Opinion
- India Bangladesh Relations & Tarique Rahman Visit Controversy | Palki Sharma
9 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

बांगलादेश भारतासाठी एक अडचण बनत चाललाआहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे आता कठीण होतआहे. सध्या सर्वात मोठा मुद्दा बांगलादेशचे पंतप्रधानतारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याचा आहे.भारताने त्यांना अधिकृत निमंत्रण दिले आहे. खरे तर दोननिमंत्रणे आहेत—एक द्विपक्षीय दौऱ्याचे आणि दुसरेब्रिक्स परिषदेचे. तरीही रहमान भारतात येणार का,याबद्दलचा गोंधळ रोज वाढत चालला आहे.
ऑगस्टच्या शेवटी ते येतील अशी अपेक्षा होती. पण नंतरशेख हसीना यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नव्यासरकारवर बांगलादेश उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला.दुसरीकडे, रहमान यांच्या मंत्र्यांनी भारतावर हसीना यांनापाठिंबा दिल्याचा आरोप केला. यामुळे हा दौरालांबणीवर पडला. आता रहमान यांच्या सल्लागारांचेम्हणणे आहे की, त्यांचा पहिला भारत दौरा हा द्विपक्षीयच असावा. यामुळे ब्रिक्स परिषदेतील त्यांच्या सहभागाची शक्यता संपल्यासारखीच आहे. तर दुसरीकडे द्विपक्षीयदौरा अजूनही अनिश्चित आहे. रहमान यांच्यादौऱ्याबाबतचा हा गोंधळ दोन्ही देशांतील अनिश्चित संबंधाचाच पुरावा आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे आता हसीना यांच्या काळातील जुन्या दिवसांतपरत जाणे शक्य नाही. हसीना यांचा कार्यकाळ दोन्ही देशांतील अत्यंत जवळीक, विश्वास आणि सहकार्याचाहोता. ढाका हा भारताचा विश्वासू भागीदार होता. आतामात्र गणिते बदलली आहेत. आज तिथे उदारमतवादीआणि धर्मनिरपेक्ष पक्षासाठी फारशी जागा उरलेली नाही.तसेच मतदारांच्या एका वर्गात भारताविषयी संशयवाढला आहे. हसीना आजही पुनरागमनाच्या गप्पामारतात, पण सध्या तरी ते अशक्य दिसते. सुरवातीलारहमान यांची भूमिका भारताबाबत तर्कसंगत व संतुलितवाटत होती. पण अलीकडचे संकेत चिंताजनक आहेत.पाकिस्तानसोबत काम करण्याची बांगलादेशची वाढतीउत्सुकता चिंतेची बाब आहे. याचे सर्वात मोठे उदाहरणम्हणजे ‘इस्लामिक नाटो'' म्हटले जाणाऱ्या आघाडीतीलढाकाचे स्वारस्य. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणितुर्किये यांनी एका परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केलीआहे. या करारानुसार, या तिन्हींपैकी एका देशावरझालेला हल्ला सर्वांवर झालेला हल्ला मानला जाईल.बांगलादेशने आता म्हटले आहे की, या तीन देशांशीजोडलेल्या कोणत्याही आर्थिक किंवा लष्करी चौकटीतसामील होण्याबाबत त्यांची भूमिका सकारात्मक आहे.असे झाले तर 1971 चा इतिहास व मुक्तीसंग्राम काळातपाकिस्तानी सैन्याने केलेला नरसंहार यानंतरही हे दोन्हीदेश एकाच लष्करी आघाडीत येऊ शकतात. हीपरिस्थिती रणनीतिकदृष्ट्या भारतासाठी अस्वस्थकरणारी आहे. सध्या हा कथित ‘इस्लामिक नाटो'' गटप्रामुख्याने पश्चिम आशियापुरता मर्यादित आहे. ते थेटभारताच्या विरोधात दिसत नाही. पण बांगलादेश त्याचासदस्य होताच संपूर्ण परिस्थिती बदलेल. मग हा गटदक्षिण आशियात आणि पर्यायाने भारताच्या पूर्वसीमेपर्यंत येऊन पोहोचेल. बांगलादेश परराष्ट्र धोरणाचाविस्तार करत आहे. हे पुढेही सुरू राहील. या दुसऱ्यावास्तवासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल.बांगलादेश हा महत्त्वाचा किनारपट्टीचा 17.8 कोटीलोकसंख्येचा देश आहे. गेल्या दोन दशकांतील त्याचीआर्थिक प्रगतीही प्रभावी राहिली. अमेरिका , चीन तिथेआपला प्रभाव पाडू पाहतोय. युरोपलाही तिथे आपलाहिस्सा हवा आहे. आता पश्चिम आशियातील शक्तीहीया समीकरणात सहभागी होत आहेत. हसीना यांच्याकाळातही बांगलादेश आपले परराष्ट्र धोरण व्यापक करतहोता. रहमान यांच्या काळात ही प्रक्रिया आणखी वेगवानहोण्याची शक्यता आहे. भारत हे रोखू शकत नाही.बांगलादेशने इतर देशांना दूर ठेवून फक्त भारताचीचनिवड करावी, अशी अपेक्षा भारत करू शकत नाही.परंतु, स्वतःचे हितसंबंध जपणे आणि थेट भारताच्यासुरक्षेवर परिणाम करणारा रणनीतिक पर्याय निवडणे यातफरक आहे. पाकिस्तानशी जोडलेला आणि भारताच्यापूर्व शेजारापर्यंत पोहोचणारा कोणताही लष्करी करार हादुसऱ्याच श्रेणीत येईल. आपल्याला सावधगिरीचासमतोल साधावा लागेल—शत्रुत्वाशिवाय सतर्कता ,संवाद ठेवावा लागेल. काही दिवसांपूर्वी भारतीयउच्चायुक्तांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदींना रहमानयांचा भारत दौरा ‘संस्मरणीय'' करायचा आहे. कदाचितभारत व्यक्तिगत मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवत आहे. हीवाईट कल्पना नाही. कारण राजकीय उलथापालथअसूनही या नात्याचा पाया अजूनही मजबूत आहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. )

भारताचे ध्येय जुना बांगलादेश परतमिळवणे हे नाही. भारताला आता नव्याबांगलादेशसोबत काम करण्याचा नवामार्ग शोधावा लागेल. बांगलादेश जास्तस्वतंत्र आहे. तेथे जास्त विविधता आहे.तो आपल्याशी पूर्णपणे मैत्रीपूर्ण नसला,तरीही एक महत्त्वाचा शेजारी देश आहे.

This post was originally published on this site.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



