गेली सहा वर्षे जगासाठी अतिशय कठीण होती.कोविड-19 ची महामारी असो किंवा युक्रेन आणिगाझामधील युद्ध, संकटांची मालिका थांबलेली नाही.त्यातच मध्य-पूर्वेत इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरहल्ला करून अनावश्यक युद्ध सुरू केले. त्यामुळे जगआणखी खोल संकटात लोटले गेले. आपणजागतिकीकरणाच्या युगात राहत असल्याने या युद्धाचेआर्थिक समस्या निर्माण केल्या. भारतही त्यापासूनअलिप्त नाही. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्यानेमोठा नकारात्मक परिणाम होत आहे. विकासाचा वेगमंदावला असून महागाई वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने तर ही महागाई आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. भारतीय रुपयाची आजवरची मोठी घसरण आपण पाहतोय. खरे तर, जगातील प्रमुख चलनांमध्ये भारतीय रुपयाचेच मूल्य सर्वात वेगाने घसरले आहे. या युद्धाच्या आर्थिक परिणामांचा भारताला इतकाफटका का बसत आहे? याचे साधे उत्तर असे की- भारताचा पाया मजबूत असला तरी, व्यावसायिक धोरणे आखण्याबाबत आपण फारसे प्रयत्न करताना दिसतनाही. अलीकडेच सहा आठवड्यांच्या भारत दौऱ्यानंतरमी खूप आशावादी होतो. या दौऱ्यात मी अनेक शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांना भेटी दिल्या. माझ्या याप्रवासाची सुरुवात पुणे येथील सिम्बायोसिसच्यानिसर्गरम्य परिसरातील परिषदेने झाली. नंतरचा मुक्कामकोलकात्यात होता. प्रेसिडेंसी कॉलेजसारख्या समृद्धइतिहास असलेल्या संस्थेत व्याख्यान देणे व तिथल्याउत्साही विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधणे हा एकविलक्षण अनुभव होता. कोलकात्याहून मी पुरुलियालागेलो. तिथे फिलिक्स स्कूलच्या विद्यार्थ्यांशी गप्पामारल्या. तिथे ‘डिस्कव्हर द वर्ल्ड ऑफ इकॉनॉमिक्स''हा कार्यक्रम सुरू होता. गणितज्ज्ञ महान महाराज,अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक आणि इतरांची व्याख्यानेऐकण्यासाठी संपूर्ण भारतातून विद्यार्थी तिथे आले होते.या आदिवासी भागात ग्रामीण, शहरी विद्यार्थ्यांसोबतअर्थशास्त्र, राजकारण,भूमितीवर चर्चा करताना मनातनवी आशा जागृत झाल्याशिवाय राहत नाही. माझाशेवटचा थांबा दिल्ली होता. तिथे गुरु गोबिंद सिंहकॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी व्याख्यान दिले. तिथे मीदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवतअसतानाचे माझे अनेक जुने विद्यार्थी भेटले. प्रतिभावानविद्यार्थी व उत्साही शिक्षकांना भेटल्यानंतर भारताच्याभविष्याबद्दल मी पुन्हा एकदा आश्वासक झालो. या सर्वठिकाणच्या लोकांशी संवाद साधताना जाणवले की,भारतात प्रचंड मानवी प्रतिभा आणि अफाट क्षमता आहे.मात्र मी सरकारच्या धोरणांकडे व आणि भारतीयअर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीकडे पाहतो, तेव्हा मला चिंतावाटते. जमिनीवर ठोस धोरणे न राबवल्यामुळे आपणअर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान करत आहोत. गेल्यादहा-बारा वर्षांत संशोधन आणि आकडेवारीच्या क्षेत्रातआपण मागे पडत चाललो आहोत. सध्या सर्व लक्षफक्त ‘हेडलाईन-जीडीपी''वर केंद्रित झाले आहे.जीडीपी म्हणजे देशातील सर्व लोकांनी मिळूनकमावलेले एकूण उत्पन्न. पण हे उत्पन्न लोकसंख्येतकशा प्रकारे विभागले गेले आहे, याबद्दल जीडीपीकाहीच सांगत नाही. केवळ दोन-तीन श्रीमंत कुटुंबांचेउत्पन्न प्रचंड वाढले तर जीडीपी वाढलेलाच दिसेल; मगभलेही देशातील मोठी लोकसंख्या बेरोजगार आणिदयनीय अवस्थेत का असेना! म्हणूनच भारतातील नेतेदरडोई उत्पन्न, तरुण पिढीतील बेरोजगारी, शेवटच्या 50टक्के लोकांच्या राहणीमानाबद्दल क्वचितच बोलतानादिसतात. भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वातंत्र्यही गमावतचालला आहे. एकेकाळी भारत अलिप्ततावादीचळवळीचे नेतृत्व करत होता आणि आपल्या बौद्धिकनेतृत्वाचा जगात मोठा आदर होता. माझी तिसरी चिंताउच्च शिक्षणाबद्दल आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्याआयआयटी, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सयांसारख्या संस्थांनी देशाला जागतिक दर्जाचे संशोधकदिले. परंतु 75 वर्षांतील उच्च शिक्षणाच्या याकामगिरींचा योग्य सन्मान न राखणे हा देशावर एकप्रकारे अन्यायच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारत सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेरपडेल. आपल्या बौद्धिक वारशाची प्रचितीदेईल आणि लोकशाही तसेचधर्मनिरपेक्षतेच्या आदर्शांमुळे आपल्यालाजगात मान मिळाला होता ते आदर्श पुन्हाप्रस्थापित करेल, अशी मला आशा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




