सकाळी फिरणारा एक जण म्हणाला, ‘माझ्या शेजाऱ्याने अक्षय्य तृतीयेला कर्जाशिवाय ऑडी विकत घेतली आहे.’ हे बोलून पूर्ण होईपर्यंत दुसरा म्हणाला, ‘काय सांगतोस? माझ्या शेजाऱ्यानेही काल मर्सिडीज घेतली आहे. काय योगायोग आहे.’ सोमवारी पवई प्रोमेनेडवर मॉर्निंग वॉकदरम्यान अशीच चर्चा सुरू झाली. खरे सांगायचे तर मला नवल वाटले नाही. आदल्या रात्रीच मला अंदाज आला होता की सकाळी कशाबद्दल चर्चा होणार आहे. मुंबईत वीकेंडला गाड्यांच्या खरेदीत वाढ झाल्याची बातमी पसरली होती. नवीन कारच्या नोंदणीत 8% आणि दुचाकींच्या नोंदणीत 37% वाढ झाली होती, कारण खरेदीदार अक्षय्य तृतीयेला डिलिव्हरी मिळण्याची वाट पाहत होते. सुखद सकाळचे ऊन, या शर्यतीसमोर फिके पडत होते. मी गालातल्या गालात हसत त्यांचे बोलणे ऐकत होतो. एका जिज्ञासू व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला विचारले, ‘तुमचा शेजारी एवढा श्रीमंत आहे हे तुम्ही आधी कधीच सांगितले नाही?’ उत्तर आले, ‘तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्याकडे बऱ्यापैकी बँक बॅलन्स होता.’ आता त्यांचा बोलण्याचा टोन थोडा बदलला होता, ज्यामध्ये अभिमान व स्पष्टीकरण दोन्ही होते. मग मला हसताना पाहून त्या व्यक्तीने विचारले, ‘तू का हसतोयस?’ त्यांच्या आवाजात थोडी चिडचिड जाणवत होती. मी शांतपणे म्हणालो, ‘मला वाटते की येत्या काही दिवसांत तुमच्यात काहीतरी बदलेल.’ त्यांनी हे हलक्यात घेत म्हटले, ‘मी 60 वर्षांहून अधिक वयाचा आहे, 30 वर्षांचा नाही, जो शेजाऱ्याच्या यशामुळे असुरक्षित वाटून घेईल.’ वाद घालण्याऐवजी मी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा व फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ फिलाडेल्फियाच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासाचा संदर्भ दिला. 2004 ते 2014 दरम्यान हजारो घरांवर हा अभ्यास करण्यात आला, हे समजून घेण्यासाठी की जेव्हा एखाद्याकडे अचानक पैसा येतो - जसे, लॉटरी जिंकणे किंवा महागडी वस्तू खरेदी करणे - तेव्हा शेजारी काय परिणाम होतो? ते सविस्तर ऐकतील, त्यापूर्वी मी त्यांना एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही वॉकला येण्यापूर्वी तुमच्या कारकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले होते का?’ ते थांबले. होकारही देऊ शकले नाहीत व नकारही देऊ शकले नाहीत. मी म्हणालो, ‘म्हणूनच मी हसत होतो.’ संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत रंजक होते. जेव्हा शेजारचा कुणी लक्झरीवर अधिक खर्च करतो तेव्हा सामाजिक मापदंड बदलतात. लोक त्यात गुंतू लागतात. अर्थशास्त्रज्ञ याला ‘कन्स्पिक्युअस कंझम्पशन’ म्हणतात- म्हणजेच उपयोगासाठी नाही, तर प्रतिष्ठा दाखवण्यासाठी खर्च करणे. विशेष म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बदलत नाही, परंतु त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. याच गोष्टीला 2010 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकच्या आणखी एका अभ्यासाने सिद्ध केले. 80 हजारांहून अधिक प्रौढांवर केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले की लोकांचे जीवनातील समाधान त्यांच्या स्वतःपेक्षा इतरांच्या उत्पन्नाशी होणाऱ्या तुलनेवर अधिक अवलंबून असते. सोप्या भाषेत सांगायचे तर लोक आपल्या संपत्तीवरून नाही, तर इतरांशी तुलना करून स्वतःला श्रीमंत किंवा गरीब मानतात. इथूनच समस्या सुरू होते. एका श्रीमंत शेजाऱ्यामुळे तुम्ही कधीही आर्थिक दबावाखाली येऊ नये. पण बऱ्याचदा असेच घडते. हीच तुलना समाधान नष्ट करते. सत्य अस्वस्थ करणारे आहे, परंतु महत्त्वाचे आहे. पैशासोबतचे निरोगी नाते तुलनेवर नाही, तर आतून निर्माण होते. आपल्या पैशाबद्दल सुरक्षित वाटणारे लोक आपले यश स्वतः ठरवतात. मग ते वैयक्तिक ध्येय साध्य करणे असो किंवा आर्थिक शिस्त पाळणे असो, किंवा ते कुठून कुठपर्यंत पोहोचले आहेत हे समजून घेणे असो. आमचा वॉक संपला आणि चर्चा कार व शेजाऱ्यांवरून दुसऱ्या विषयांवर वळली. पण एक प्रश्न उरला : आपण आपले आयुष्य जगत आहोत, की फक्त ते मोजत आहोत? फंडा असा की - जेव्हा शेजाऱ्याच्या यशामुळे तुम्ही स्वतःला गरीब समजू लागता, तेव्हा समस्या संपत्तीची नाही, तर तुमच्या दृष्टिकोनाची असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




