Pune : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीीची समाज माध्यमात बदनामी, कोथरुड पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

Pune : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीच्या नावे समाज माध्यमात बनावट खाते उघडून बदनामी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी कोथरुड भागात राहायला आहे. आरोपी तरुणीचा मित्र आहे. तरुणीने त्याच्याबरोबर असलेले प्रेमसंबंध तोडले

. प्रेमसंबंध तोडल्याने आरोपी तिच्यावर चिडला होता. त्याने तरुणीच्या नावे समाज माध्यमात बनावट नावाने खाते उघडले. समाज माध्यमातील खात्यावर तरुणी आणि तिच्या आईच्या नावे बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. त्याने अश्लील छायााचित्रे प्रसारित केली.

तरुणीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने त्याच्याकडे विचारणा केली. आरोपीने तरुणीला शिवीगाळ केली. पोलिसांकडे तक्रार दिली तर तुला जीवे मारु, अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *