इराण युद्ध अनेक कारणांसाठी लक्षात ठेवले जाऊशकते. परंतु त्याचा एक परिणाम असा आहे, ज्याकडेमुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. आधुनिक इतिहासाततेलाच्या पुरवठ्यात प्रथमच एवढा मोठा अडथळानिर्माण झाला आहे. यामुळे तेलाची जागतिक मागणीकमी करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. चारमहिन्यांपूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाल्यामुळेजागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले होते. तेलाच्या किमतीझपाट्याने वाढल्या आणि व्यापार विस्कळीत झाला.सरकारे ग्राहकांना महागाईपासून वाचवण्यासाठी सक्रियझाली आणि व्यवसायांनाही स्वतःमध्ये बदल करावेलागले. पण यादरम्यान आणखी एक नवा प्रवाह समोरआला आहे. देशांनी कमी तेलात गुजराण करण्यासाठी स्वतःला बदलवण्यास सुरुवात केली आहे. ऊर्जा क्षेत्राला आपल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गृहीतकावर पुन्हा विचार करणे भाग पडले आहे. ते गृहीतक म्हणजे, तेलाची जागतिक मागणी सातत्याने वाढतच राहील. युद्धापूर्वी, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) एक अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, 2024 ते 2030 दरम्यान तेलाची मागणी दररोज 25 लाख बॅरलने वाढणार होती. तसेच या दशकाच्या अखेरीस ती दररोज सुमारे 10 कोटी55 लाख बॅरलच्या पातळीवर पोहोचून स्थिर होणार होती.तेव्हा चर्चा यावर नव्हती की मागणी वाढत राहील कीनाही, तर ती वाढ किती वेगाने मंदावेल यावर होती. आता‘आयईए’चा अंदाज आहे की, 2026 मध्ये तेलाचीजागतिक मागणी युद्धापूर्वीच्या अंदाजापेक्षा दररोज सुमारे13 लाख बॅरलने कमी असेल. या घसरणीचे काही कारणकमकुवत आर्थिक परिस्थिती आणि वाढलेल्या किमती हेआहे, तर उर्वरित कारण म्हणजे लोकांनी परिस्थितीशीजुळवून घेणे हे होय. मर्यादित पुरवठा आणिअनिश्चिततेचा सामना करत सरकार आणि उद्योगांनीतेलावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्नअधिक वेगवान केले आहेत. बाजारानेही या परिस्थितीलातशीच प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्यांच्या बातम्यांमुळेतेलाच्या किमती वाढल्या आणि राजनैतिक चर्चेच्याबातम्यांमुळे त्या घसरल्या. जरी किमती युद्धादरम्यानच्यासर्वोच्च पातळीवरून खाली आल्या असल्या तरी त्याअजूनही युद्धापूर्वीच्या पातळीपेक्षा जास्तच आहेत.युद्धापूर्वी दररोज सुमारे 125 ते 140 जहाजे होर्मुझमधूनजात असत. हा जलमार्ग अत्यंत विश्वासार्ह मानला जातहोता. तिथे दीर्घकाळ कोणताही अडथळा येईल, अशीशक्यता खूपच कमी वाटत होती. परंतु होर्मुझ बंदझाल्यामुळे सरकार आणि कंपन्यांना ऊर्जा सुरक्षेशीसंबंधित त्यांच्या विचारांवर पुन्हा विचार करणे भाग पडलेआहे. आता जरी वाहतूक पुन्हा सुरू झाली आणिहोर्मुझमधील समुद्री सुरुंग हटवले गेले, तरी गेल्या चारमहिन्यांचा अनुभव बदलता येणार नाही. युद्धापूर्वी चीन दररोज सुमारे 1 कोटी 10 लाख बॅरलतेलाची आयात करत होता. त्यानंतर त्याने आपल्यासाठ्यांचा वापर केला, रिफायनरीच्या कामात बदल केलेआणि काही पेट्रोकेमिकल कच्च्या मालासाठी कोळशाचापर्याय स्वीकारला. यातून चीनने आयातीत मोठी कपातकेली आहे. अनेक विश्लेषकांच्या मते, चीनची आयातकमी करण्याची ही क्षमताच एक मुख्य कारण ठरली,ज्यामुळे तेलाच्या किमती अपेक्षेइतक्या वाढल्या नाहीत. हे लक्षात ठेवले पाहिजे की, गेल्या एका दशकाततेलाची जागतिक मागणी वाढण्यामागे चीन हेच सर्वातमोठे कारण राहिले आहे. 2015 ते 2024 दरम्यान चीनचीतेलाची मागणी दररोज सुमारे 60 लाख बॅरलने वाढली. हीवाढ जागतिक मागणीतील वाढीच्या सुमारे 60% होती.आता केवळ चीनच असे करत नाहीये. आशिया आणिजगाच्या इतर भागांतील सरकारांनीही वेगाने अशी पावलेउचलली आहेत. आठवड्यातून केवळ चार दिवस काम,घरून काम करण्याची धोरणे, एअर कंडिशनिंगवरनिर्बंध, उद्योगांसाठी इंधनाचे रेशनिंग, आपत्कालीनसबसिडी, करांमध्ये कपात आणि शेतीसाठी थेट मदत –हे सर्व आता सरकारी धोरणांचे महत्त्वाचे भाग बनलेआहेत. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) जगातील बहुतांश देशांनी कमी तेलासहजगण्यासाठी स्वतःला जुळवून घेण्याससुरुवात केली आहे. ऊर्जा क्षेत्रालाआपल्या एका गृहीतकावर पुन्हा विचारकरणे भाग पडले आहे. ते गृहीतक म्हणजेतेलाची मागणी सातत्याने वाढतच राहील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



