भारतात मोबाइल, स्वस्त डेटा आणि नव्या ॲप्समुळेआयुष्य सोपे झाले आहे. किराणा घरपोच मिळतो. टॅक्सीदारात येते. जेवण मोबाइल स्क्रीनवरून थेट ताटात येते. पणआता ॲपद्वारे मानवी मदतही मागणीनुसार मिळू लागलीआहे. म्हणजेच एखादी व्यक्ती तुमच्यासोबत बाजारातयेईल. तुमच्या पिशव्या उचलेल. तुमच्यासाठी रांगेत उभीराहील. तुम्हाला पाणी देईल. खुर्ची लावून देईल आणितुमच्या छोट्या-मोठ्या वैयक्तिक सोयींकडे लक्ष देईल.याला आधुनिक सेवा, सुविधा आणि रोजगाराचे नवेमॉडेल म्हटले जात आहे. पण ही खरोखरच सुविधा आहेकी सरंजामशाहीची नवी ॲप-आधारित आवृत्ती? सुविधा वाईट नसते. पण ती जेव्हा आपल्याला आजारी,निष्क्रिय, परावलंबी आणि असंवेदनशील बनवू लागते,तेव्हा आपण थांबून विचार करायला हवा. ॲपवरूनमागवलेली सुविधा स्वस्त वाटू शकते. पण तिचीसामाजिक आणि आरोग्याशी संबंधित किंमत खूप मोठीआहे. आपण समानता, स्वावलंबन आणि आरोग्याकडेवाटचाल करणार आहोत की डिजिटल सरंजामशाहीकडे,हे देशाला ठरवावे लागेल. पूर्वी अशी वृत्ती दरबार, क्लबआणि नोकरांच्या रांगांमध्ये दिसायची. आता तीचमानसिकता मोबाइल ॲप, डिजिटल पेमेंट आणिस्टार्टअप्सच्या चकचकीत भाषेतून परत येत आहे. एखाद्याला रोजगार देणे यातही काही गैर नाही. शेवटी सेवाक्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा आवश्यक भाग आहे. ड्रायव्हर,घरकाम करणारे, सुरक्षा रक्षक, नर्सिंग अटेंडंट, डिलिव्हरीबॉय हे सर्वजण सन्माननीय आणि आवश्यक काम करतात.अडचण कामात नाही, तर त्या मानसिकतेत आहे. जेव्हाएखादी सक्षम, निरोगी आणि चालती-फिरती व्यक्तीस्वतःचे पाणी स्वतः घेणे, सामान उचलणे, रांगेत उभेराहणे किंवा थोडे चालणे हे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेच्याविरुद्ध मानू लागते, तेव्हा खरी अडचण निर्माण होते. हा विचार केवळ सामाजिक दृष्ट्याच चिंताजनक नाही,तर आरोग्यासाठीही हानिकारक आहे. आधुनिक शहरीभारत आधीच बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, फॅटी लिव्हर, पाठदुखी, तणाव आणि अपुरी झोपयासारख्या समस्यांचा सामना करत आहे. डॉक्टर दररोजरुग्णांना तोच सल्ला देतात. जास्त चाला, पायऱ्या चढा,छोटी कामे स्वतः करा आणि दैनंदिन कामात शरीराचीहालचाल ठेवा. मात्र ॲप-आधारित सुविधांची संस्कृती आपल्यालाउलट्या दिशेने ढकलत आहे. ती सांगते- तुम्ही चालू नका,दुसरे कुणीतरी चालेल. तुम्ही उचलू नका, दुसरे कुणीउचलेल. तुम्ही रांगेत थांबू नका, दुसरे कुणीतरी थांबेल.थोडक्यात सांगायचे तर, शरीराला निष्क्रिय आणिअहंकाराला सक्रिय ठेवा. केवळ जिममध्ये एक तास घाम गाळल्याने आरोग्यघडत नाही. आरोग्य हे दिवसभरातील छोट्या-छोट्याशारीरिक हालचालींतून घडते. बाजारात चालणे, स्वतःचेसामान उचलणे, घरातील छोटी कामे करणे, बस किंवामेट्रोपर्यंत चालत जाणे, रांगेत उभे राहणे, स्वतःचे पाणीस्वतः घेणे आणि मुलांसोबत खेळणे या सर्व गोष्टींचा त्यातसमावेश होतो. आधुनिक जीवनशैलीतून याच गोष्टी वेगानेगायब होत आहेत. जेव्हा आपण प्रत्येक छोटे काम‘आउटसोर्स’ करतो, तेव्हा आपण फक्त पैसे खर्च करतनाही तर आपले स्नायू, हाडे, पचनसंस्था आणिस्वावलंबनही कमकुवत करत असतो. रोजगारआवश्यक आहे, पण प्रत्येक रोजगार म्हणजे सामाजिकप्रगती नसते. सभ्य समाज केवळ नोकऱ्यांच्या संख्येवरठरत नाही. तो कामाची प्रतिष्ठा, कामगारांचे अधिकार,सामाजिक समानता व मानवी संबंधांच्या मूल्यांवरूनहीघडतो. आपल्याला अशी अर्थव्यवस्था हवी, जी लोकांनासन्मान देईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



