मी त्यांना विचारले की, ‘तुम्ही कसे आहात?’ वर्माजी अत्यंत खिन्न अंदाजात म्हणाले की, ‘मला वाटते माझी ‘टू-डू-लिस्ट’ मी या जगातून गेल्यानंतरही संपणार नाही.’ त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची तक्रार केली, जे ऑफिसमध्ये त्यांचा वेळ खराब करण्यात मग्न असतात. त्यामुळे वर्माजी स्वतःला ओव्हरलोडेड समजायचे आणि नेहमी तणावात घरी परतायचे. ही 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे संध्याकाळी कुटुंबासोबत जो वेळ मिळायचा, तोही खराब व्हायचा. त्यांनी मला विचारले की काय करू? मी त्यांना एका ओळीचा सल्ला दिला- ‘एक ‘नॉट-टू-डू लिस्ट’ बनवायला सुरुवात करा.’ अत्यंत निरागसपणे वर्माजींनी विचारले की, ‘तुमचे म्हणणे आहे की जुन्या ‘टू-डू-लिस्ट’ सोबत मी ही नवीन लिस्टही सुरू ठेवू?’ त्यांच्या लहान मुलांसारख्या प्रश्नावर मी हसलो आणि म्हणालो, ‘तुम्ही ‘हॅमस्टर-व्हील’ लाईफमध्ये अडकले आहात, त्यामुळे तुम्ही क्लॉडिया हॅमंडचे पुस्तक ‘ओव्हरव्हेल्म्ड: वेज टू टेक द प्रेशर ऑफ’ वाचले पाहिजे.’ ‘हॅमस्टर-व्हील’ लाईफचा अर्थ अशी दिनचर्या, ज्यात तुम्ही रात्रंदिवस काम करता आणि अत्यंत व्यस्त राहता, पण प्रत्यक्षात कधीही ठोस प्रगती करू शकत नाही, नव्या दिशेने पुढे जाऊ शकत नाही. या रविवारी ते माझ्या घरी आले आणि त्या एका छोट्याशा टीपसाठी त्यांनी मला धन्यवाद दिले. ‘हॅमस्टर-व्हील’ लाईफचा अर्थ केवळ खूप जास्त काम करणे असा होत नाही. याचा अर्थ असा की, जी गोष्ट खरोखर महत्त्वाची आहे, तिच्या जवळ न पोहोचता अनेक गोष्टी वारंवार करत राहणे. यातून बाहेर पडण्याचे काही व्यावहारिक मार्ग येथे दिले आहेत. 1. काम करणे थांबवा, निर्णय घेणे सुरू करा : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी असे एक काम ठरवा, जे दिवसाला खरोखरच प्रॉडक्टिव्ह बनवेल. बाकी सर्व सेकंडरी आहे. तुमची ‘टू-डू-लिस्ट’ तीन भागांत विभागलेली असली पाहिजे. ए. ‘डू इट’, म्हणजेच जे काम तुमच्याशिवाय इतर कोणीही करू शकत नाही. बी. ‘डेलिगेट इट’, यालाच ‘नॉट-टू-डू-लिस्ट’ म्हणतात. यात अनावश्यक मीटिंग, कॉल, स्क्रोलिंग, छोटी-मोटी कामे आणि जबाबदाऱ्यांचा समावेश करू शकता. सी. ‘डिलीट इट’ म्हणजेच अशी कामे जी सहकाऱ्यांना खूश करण्यासाठी केली जातात, पण इथे दिसतात. स्वतःला विचारा की ‘जर मी हे काम केले नाही तर काय होईल?’ जर उत्तर असेल, ‘काहीही नाही’, तर ते डिलीट करा.
2. कॅलेंडरमध्ये रिकामी जागा सोडा : पूर्णपणे भरलेले कॅलेंडर विचार करण्याची संधी सोडत नाही. दररोज थोडा अन-शेड्यूल वेळ ठेवा- ज्यामध्ये विचार करू शकाल, प्लॅन बनवू शकाल किंवा फक्त थोडा श्वास घेऊ शकाल. या भागात व्यग्रता नाही, तर परिणामांचे मोजमाप केले पाहिजे. ‘मी 10 तास काम केले’ ही स्वतःमध्येच उपलब्धी नाही, तर स्वतःला विचारा की मी 10 तास काम केले तर काय बदलले? प्रगती दिसली पाहिजे.
3. सोमवारची सुरुवात साप्ताहिक ‘एस्केप रिव्ह्यू’ने करा : सोमवारी 30 मिनिटे आधी पोहोचा, आपल्या डेस्कवर बसा आणि स्वतःला तीन प्रश्न विचारा. ए. गेल्या आठवड्यात कोणत्या गोष्टीने मला पुढे नेले? बी. कोणत्या गोष्टीने मला व्यस्त ठेवले? सी. या आठवड्यात मी काय करणे थांबवू शकतो? हे ‘हॅमस्टर-व्हील’ला तुमची डिफॉल्ट लाईफस्टाईल बनण्यापासून रोखेल.
4. भविष्यासाठी एक तास इन्व्हेस्ट करा : दररोज कोणत्याही अडथळ्याविना एक तास अशा गोष्टीवर लावा, ज्याचा फायदा वेळेसोबत वाढेल- शिकणे, लिहिणे, व्यायाम, नाती बनवणे, एखादे स्किल डेव्हलप करणे किंवा कमाईचा एखादा अतिरिक्त मार्ग बनवणे. ‘हॅमस्टर-व्हील’ आजचा दिवस चालवते, पण हा एक तास तुमचा उद्या बनवतो. ठरवा की तुम्हाला खरोखरच काय जास्त हवे आहे- वेळ, पैसा, आरोग्य, कुटुंब, स्वातंत्र्य, क्रिएटिव्हिटी की शांतता. मग असे कॅलेंडर बनवा, ज्यात ही चॉईस रिफ्लेक्ट होईल. फिजिकल प्रेझेन्स किंवा सतत काहीतरी करत राहण्याऐवजी परिणामांवर लक्ष केंद्रित करणेच शेवटी वास्तविक प्रोडक्टिव्हिटीला केवळ दिखाव्याच्या व्यस्ततेपासून वेगळे करते. लोक बहुधा स्वतःला खूप कामाच्या ओझ्याखाली दबलेले दाखवतात किंवा आपल्या हेवी शेड्यूलबद्दल सांगतात, जेणेकरून आपले स्टेटस टिकवून ठेवता येईल, स्किल गॅप्स लपवता येतील किंवा आगामी जबाबदारी टाळता येईल. जर तुम्ही नेहमी प्रमोशन मिळवणाऱ्या लोकांना पाहिले, तर त्यांच्यात इम्प्रेशन आणि इम्पॅक्ट वेगळे करण्याची क्षमता असते. वर्माजींनी दिवसाचे मूल्यांकन या आधारावर करणे सुरू केले की त्यांनी खरोखर काय प्रोड्यूस केले किंवा सोडवले, या आधारावर नाही की त्यांच्या कॅलेंडरमध्ये किती टास्क भरलेले होते.
फंडा असा आहे की, जेव्हा तुम्ही वर्कप्लेसवर इम्प्रेशन मॅनेजमेंटकडून इम्पॅक्ट मॅनेजमेंटकडे वळता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्याला केवळ ‘मेंटेन’ करण्याऐवजी त्याला ‘बदलण्याच्या’ मार्गावर चालायला सुरुवात करता. निवड तुमची आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

सायन-कोळीवाड्यात पुजाऱ्याचे अनोखे आंदोलन! कचऱ्याच्या समस्येकडे वेधले प्रशासनाचे लक्ष!
31 October 2026
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण संपन्न! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




