कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय पर्यटकांविषयी सर्च करून पाहा, परदेश दौऱ्यावरील त्यांच्या वागणुकीचे किंवा गैरवर्तनाचे अनेक व्हिडिओ समोर येतील. एक गट चीनच्या भिंतीवर उत्सवी पोशाख घालून गरबा खेळत आहे. दुसरा गट व्हिएतनाममधील हनोईच्या प्रसिद्ध ट्रेन स्ट्रीटवर शाहरुख खानच्या ‘छैंया छैंया’ गाण्यावर नाचत आहे. एक गट व्हिएतनाममधीलच एका विमानतळावर रनवेजवळील रस्त्यावर डान्स करत आहे, ज्यामुळे तेथील सुरक्षा कर्मचारी वैतागलेले दिसतात. तर दुसरा एक गट, अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या सीमेवर असलेल्या इग्वाझू फॉल्सवर बोट सफारी करताना ‘इंडिया, इंडिया’च्या घोषणा देत आहे. याआधी याच लोकांनी बोटीत चढताना रांग मोडण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्कीही केली होती. पॅरिस, लंडन, बँकॉक ते बालीपर्यंत अशी अनेक उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. क्वचितच असे एखादे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ उरले असेल, जिथे भारतीय पर्यटकांनी व्यवस्थेत व्यत्यय आणला नसेल. एक काळ असा होता, जेव्हा परदेशातील त्यांच्या उद्धट वागणुकीमुळे अमेरिकन पर्यटकांना ‘द अग्ली अमेरिकन’ म्हटले जाऊ लागले होते. असे दिसते की भारतीयांवरही तसाच शिक्का बसणार आहे, सर्वच भारतीय पर्यटक असे गैरवर्तन करतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही. खरे तर प्रवास-शिष्टाचाराच्या उल्लंघनाबाबत सोशल मीडियावर जी नाराजी दिसून येते, ती बहुतांश भारतीयच व्यक्त करतात. कारण त्यांना भीती असते की मूठभर लोकांच्या बिघडलेल्या वागणुकीमुळे देशविदेशात भारताची प्रतिमा मलिन होत आहे. पण त्यांनी चिंता व्यक्त करूनही भारतीय पर्यटकांविषयी अशा कहाण्या समोर येतच राहतात की ते किमतींवरून उग्र होऊन घासाघीस करतात, वेटर आणि दुकानदारांशी उद्धटपणे बोलतात. इतकेच नाही तर हॉटेलातून साबण, टॉवेल आदी वस्तूही चोरून आणतात. अलीकडेच उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ‘एक्स’वर स्वतःसोबत घडलेल्या अशाच एका लाजिरवाण्या घटनेचा उल्लेख करत लिहिले की, अशा वागणुकीमुळे ‘ब्रँड इंडिया’ला कशी नामुष्की सहन करावी लागते. त्यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडमधील ग्स्टाड या पर्यटन स्थळावरील एका हॉटेलमध्ये भारतीय पर्यटकांसाठी असलेल्या विशेष नियमांची यादी पाहून त्यांना धक्काच बसला. हॉटेलच्या प्रत्येक खोलीत लावलेल्या नोटीसमध्ये भारतीयांसाठी इशारा होता की त्यांनी मोफत ब्रेकफास्ट बुफेमधून अन्न बाहेर नेऊ नये. फक्त पुरवण्यात आलेली कटलरीच वापरावी आणि बाल्कनी तसेच कॉरिडॉरमध्ये गोंधळ घालू नये. त्यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख केला की, एक भारतीय व्यावसायिक एका वर्षी दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीला गेले आणि रेस्टॉरंटमध्ये इतक्या मोठ्या आवाजात पंजाबी संगीत वाजवू लागले की संपूर्ण शहराला ऐकू जाईल. ते याला भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चे प्रदर्शन म्हणत होते. खरी गोष्ट ही आहे की, देशात राहून सामाजिक शिष्टाचाराचा जो अभाव आपण दाखवतो, तो आता परदेशातही दिसू लागला आहे. दररोज आपण पाहतो की विमाने आणि रेस्टॉरंट्समध्ये मुलांना उड्या मारण्याची आणि गोंधळ घालण्याची मोकळीक दिली जाते. पालक इतरांना होणाऱ्या त्रासापासून अनभिज्ञ राहून बसलेले असतात. लोक रस्त्यावर चॉकलेटचे रॅपर आणि चिप्सची रिकामी पाकिटे फेकून देतात. सोमवारी एखाद्या सार्वजनिक उद्यानात जा, जिथे कुटुंबांनी रविवारी पिकनिक साजरी केलेली असते. तिथे कचराकुंड्या असूनही जागोजागी कागदी प्लेट्स, ग्लास आणि खरकटे अन्न विखुरलेले असते. अनेक देशांमध्ये, विशेषतः विकसित देशांमध्ये, मूलभूत नागरी भान शालेय स्तरावरूनच शिकवले जाते आणि घरात त्याचे पालन करवून घेतले जाते. परंतु असे वाटते की, कदाचित आपण चांगले नागरिक बनण्याचे महत्त्वच विसरलो आहोत. नकोशा पर्यटकांना चाळणी लावण्यासाठी थायलंडने आपल्या व्हिसा धोरणात बदल केला आहे. त्यांनी 93 देशांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश समाप्त केला आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे, भारतातून सर्वाधिक पर्यटक थायलंडला जातात. अशा स्थितीत स्वतःची आणि आपल्या देशाची चांगली प्रतिमा सादर करणे आपले कर्तव्य बनते. अखेर, पर्यटकही मुत्सद्दी अधिकाऱ्यांप्रमाणेच भारताचे प्रतिनिधी असतात. (हे लेखिकेचे स्वतःचे विचार आहेत)
पर्यटक परदेशात भारताचे प्रतिनिधी असतातआज भारतीयांची जागतिक उपस्थिती वाढली आहे. आपल्या पर्यटकांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाते. अशा परिस्थितीत देशाची उत्तम प्रतिमा सादर करणे हे आपले कर्तव्य आहे. पर्यटकही मुत्सद्दी अधिकाऱ्यांप्रमाणेच भारताचे प्रतिनिधी असतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




