अंकशास्त्रानुसार ४ ऑगस्ट २०२६ रोजीचा मंगळवार सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. मूलांक १, ३, ४ सह काही मूलांकांसाठी व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे, तर मूलांक २ आणि ५ सह काही मूलांकांनी संयम आणि संवादावर विशेष भर द्यायला हवी. या दिवशी सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून कोणालाही अपशब्द बोलू नका. सर्व मूलांकांनी जर योग्य नियोजन, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव यावर फोकस ठेवला, तर हा मंगळवार नक्कीच अतिशय लाभदायक ठरेल. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया मूलांक १ ते ९ साठी मंगळवार कसा असणार आहे:
मूलांक १ - मनासारखं होणार, वेळेचे भान ठेवा:
मूलांक १ असणाऱ्यांसाठी मंगळवार अतिशय सकारात्मक असून तुमच्या मनाप्रमाणे सर्व कामे पूर्ण होणार आहेत. आत्मविश्वासाने आणि मेहनतीने केलेले प्रयत्न खूप चांगले रिझल्ट्स देतील. काम पूर्ण करण्याचा वेग वाढेल आणि दुपारपर्यंत अनेक कामे मार्गी लागतील असे दिसते आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करताना थोडी धावपळ होईल, परंतु टीमवर्कमुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. वेळेचा योग्य वापर आणि अचूक नियोजन म्हणजे कामात यश, हे सूत्र लक्षात ठेवा.
मूलांक २ - संयम हीच खरी ताकद:
मूलांक २ साठी धैर्य आणि संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घाईघाईने निर्णय न घेता पूर्ण फोकसने आपले काम करा. शांत मनाने घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतो. ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांचा किंवा कोणाचाही द्वेष करू नका. सगळ्यांसोबत आपुलकीने वागा, ज्यामुळे कठीण काम देखील अतिशय सोपे होईल. घरामध्ये वातावरण ठीक असले तरी छोट्या-मोठ्या मतभेदाची शक्यता दिसते आहे, त्यामुळे थोडे सावध राहा.
मूलांक ३ - थांबलेले काम मार्गी लागणार:
मूलांक ३ साठी मंगळवार अनुकूल असून तुमची अनेक दिवसांपासून थांबलेली कामे पुन्हा सुरू होण्याचा योग आहे. कामाला योग्य गती मिळाल्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. जर तुम्ही व्यवसाय (बिझनेस) करत असाल, तर चांगला नफा होण्याचा योग आहे. तसेच काही नवीन तंत्रज्ञान किंवा पद्धती व्यवसायात वापरण्याचा विचार करत असाल, तर जाणकारांचा सल्ला घेऊन पुढे वाटचाल करा. नवीन प्लॅन्सवर काम सुरू करण्यासाठी देखील आजची वेळ अतिशय उत्तम आहे.
मूलांक ४ - मेहनतीचे फळ मिळेल:
मूलांक ४ असणाऱ्यांचा जास्तीत जास्त फोकस त्यांच्या कामावर आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावर असणार आहे. तुमची मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यामुळे कामाचा वेग कायम राहील. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून कौतुकाचे योग आहेत तसेच सहकारी तुमच्या कामात पूर्ण मदत करतील. विरोधकांना मुळीच घाबरू नका, ते तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. तुमचा उत्साह आणि प्रामाणिक मेहनत यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल.
मूलांक ५ - मतभेद संवादाने कमी करा:
मूलांक ५ साठी मंगळवार सकारात्मक असला तरी दिवसभर बऱ्यापैकी धावपळ होणार आहे. दुपारनंतरची वेळ तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. त्या वेळेत महत्त्वाचे निर्णय घेणे किंवा जुने प्रलंबित प्रश्न सोडवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. घर असो वा ऑफिस, कुठेही मतभेद निर्माण झाले तर ते बोलण्यातून आणि संवादातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.
मूलांक ६ - धनलाभाचा योग, आर्थिक फायदा:
मूलांक ६ साठी मंगळवार अत्यंत शुभ आणि फलदायी आहे, कारण अचानक धनलाभ किंवा आर्थिक लाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. व्यापाऱ्यांसाठी खूप चांगली बातमी मिळू शकते, तुमचे बऱ्याच काळापासून अडकलेले किंवा थांबलेले पेमेंट आज हाती येऊ शकते. आर्थिक बाबतीत तुम्ही केलेले प्रत्येक प्रयत्न यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या.
मूलांक ७ - कुटुंबाचा भक्कम पाठिंबा:
मूलांक ७ साठी मंगळवार मानसिक समाधान, सुख आणि आनंद घेऊन येणार आहे. कुटुंबाचा भक्कम सपोर्ट आणि आपुलकी यामुळे तुमचा आत्मविश्वास कैक पटीने वाढेल. सकारात्मक विचाराने कामे केल्यास नक्कीच कामाचा वेग वाढेल. मुलांच्या बाबतीत तुमच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आज तुम्ही पूर्ण करणार आहात. व्यवसायात वातावरण ठीक असले तरी संवादावर विशेष भर द्या, कामगार किंवा सहकाऱ्यांच्या काही समस्या असतील तर त्या त्वरित मार्गी लावा.
मूलांक ८ - व्यवसायात नवीन डिल होण्याचा योग:
मूलांक ८ साठी मंगळवारचा दिवस चांगला आहे. धर्म, अध्यात्म आणि सकारात्मक विचार यामुळे तुमच्या कामात उत्साह वाढेल. व्यवसायात एखादी नवीन डील फायनल होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. नोकरीत तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे, ज्यासाठी तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या अंगातील आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही अवघड आणि बिकट कामे देखील यशस्वीपणे पार पाडाल. संयम आणि मेहनत यामुळेच तुमच्यासाठी यशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत.
मूलांक ९ - संकटांना घाबरून नका, हुशारीने मात करा:
मूलांक ९ साठी मंगळवार तसा ठीक आहे, परंतु सध्या सुरू असलेल्या काही परिस्थितीमुळे तुमचे मानसिक टेन्शन वाढू शकते. अशा वेळी अजिबात घाबरू नका, तुमचे प्रामाणिकपणे काम करत राहा आणि सर्वांशी आपुलकीने वागा. अडचणी आयुष्यात येतच असतात, पण त्यावर धैर्याने आणि हुशारीने मात करायची असते. तुमची आजची मेहनत भविष्यात नक्कीच उत्तम आणि गोड रिझल्ट देईल. मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने तुम्ही सर्व संकटांवर मात करणार आहात. येणारा काळ पूर्णपणे तुमचा आहे, फक्त तुमच्या रागावर आणि बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा. जे लोक आज तुम्हाला टोमणे मारतात किंवा तुमचा रागराग करतात, उद्या तेच तुमची स्तुती आणि कौतुक करतील.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




