रायगड: तरुणाचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू; गॅलक्सी हॉस्पिटलबाहेर नातेवाईकांचा रोष आणि तणावपूर्ण वातावरण

रायगड:  पेण येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये कणे गावातील एका तरुणावर मंगळवारी 'अपेंडिक्स'ची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर, त्याची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला पनवेल येथे नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांकडूनच शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या संतप्त पालकांनी केला, तसेच मृतदेह पुन्हा हॉस्पिटलसमोर आणून तो नेण्यास नकार दर्शवित परिसरात ठिय्या मांडला होता.

निशांत तुकाराम पाटील (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या पालकांसह ग्रामस्थांनीही दिवसभर ठिय्या देत या प्रकरणी हॉस्पिटल व्यवस्थापनाविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

घटनेनंतर डीवायएसपी जालिंदर नारकुल, पेण पोलिस अधिकारी नीलेश राजपूत आणि पोलिस यंत्रणा दुपारपासून घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. निशांतवर शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निशांतचे पालक तुकाराम पाटील यांनी कुटुंबीयांसह ग्रामस्थांनीही केली आहे.
निशांत स्वतः दुकानात काम करीत होता, तर तुकाराम सोसायटीमध्ये पाणीपुरवठा करण्याचे काम करतात. घरातील कमावता मुलगा अचानक गेल्याने कुटुंबीय धक्क्यात असून, कणे गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिस यंत्रणेकडून रात्री तरुणाचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तसेच हॉस्पिटल प्रशासनातर्फे मृताच्या पालकांना आर्थिक मदत करण्यात आल्यानंतर परिसरातील तणाव अखेर निवळला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *