पुणे: महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करणारी दोन महत्त्वाची उत्पादने आता जागतिक नकाशावर चमकली आहेत. प्रसिद्ध 'लोणावळा चिक्की' आणि माहूर गडावरील पारंपरिक 'रेणुका माता तांबूल' या दोन पदार्थांना केंद्र सरकारच्या 'जीओग्राफिकल इंडिकेशन्स' (जीआय टॅग) विभागाने अधिकृत मानांकन दिले आहे. यासोबतच राज्यातील जीआय टॅग मिळणाऱ्या उत्पादनांची संख्या ५० वर पोहोचली आहे.
जीआय टॅगचे महत्त्व: भौगोलिक मानांकन हे संबंधित उत्पादनाचे मूळ, गुणवत्ता आणि ऐतिहासिक वारसा दर्शवते. या टॅगमुळे आता या दोन्ही पदार्थांच्या बनावट विक्रीवर अंकुश बसेल.
लोणावळा चिक्कीचा इतिहास: १८८२ मध्ये भिवराज अग्रवाल यांनी रेल्वे मजुरांसाठी गूळ, शेंगदाणे आणि मुरमुरे वापरून 'गूळदाणी' स्वरूपात चिक्की तयार केली होती. पुढे ही चिक्की लोणावळ्याची ओळख बनली.
माहूरचा 'तांबूल' प्रसाद: माहूरच्या रेणुका माता मंदिरात पुरणपोळीच्या नैवेद्यानंतर 'तांबूल' अर्पण करण्याची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. यात नागवेलीची पाने, जायफळ, वेलची, ज्येष्ठमध यांसारख्या औषधी घटकांचा वापर केला जातो.
प्रक्रियेतील प्रयत्न: हे मानांकन मिळवण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ आणि तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांनी पाठपुरावा केला होता. जीआय तज्ज्ञ डॉ. गणेश हिंगमिरे आणि स्थानिकांच्या मेहनतीमुळे हे यश साध्य झाले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- नांदेड: नांदेडमध्ये बनावट पोलिसाचा डाव फसला; सतर्क नागरिकामुळे सोन्याची फसवणूक टळली
- पुणे: जेजुरी गडावर `येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात पार पडला खंडेरायाचा गणपूजा उत्सव
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- नांदेड: नांदेडमध्ये बनावट पोलिसाचा डाव फसला; सतर्क नागरिकामुळे सोन्याची फसवणूक टळली
- पुणे: जेजुरी गडावर `येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात पार पडला खंडेरायाचा गणपूजा उत्सव
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
गुन्हा
- वर्धा: १२ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा संशय, परिसर हादरला
- पुणे: "आमचा ब्रँड मोठा, करायचे ते करा!" रिलायन्स आउटलेटला महागात पडले एक्स्पायर्ड चीज विकणे
- बीड: गाजलेल्या विलास घुले प्रकरणात मोठा खुलासा, उमेश मानेविरुद्ध अत्याचार, ब्लॅकमेलिंगचा गुन्हा; तपासाला नवे वळण
- मुंबई: कांदिवलीत एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय मुलीची हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी क्राइम शोमधून घेतली प्रेरणा?
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
- कर्नाटक: डॉक्टर पतीने जीव गमावला, ८ वर्षांच्या लेकावरही वार; बापलेकाजवळ बसून बायको करत होती 'फोन स्क्रोलिंग'!

























Subscribe to my channel


