संजय कुमार यांचा कॉलम:पोटनिवडणूक निकाल भाजपला‎ आत्मपरीक्षणास भाग पाडतील‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या‎निकालाने काहींना धक्का दिला आहे तर काहींना विचार‎करायला भाग पाडले. सामान्यपणे पोटनिवडणुकांत‎मतदार सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीच्या बाजूने मतदान‎करतात. या तर्कानुसार बांकीपूरमध्ये भाजपच मतदारांची‎पहिली पसंती असायला हवा होता. मात्र, निकाल‎याउलट लागले. अर्थात, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार‎पोटनिवडणुकीत कधीच पराभूत होत नाहीत, असे नाही.‎मात्र, भाजपसाठी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे‎घटलेला मतांचा टक्का. या विधानसभा मतदारसंघातून ‎‎पक्षाने सलग नऊ निवडणुका जिंकल्या होत्या आणि‎प्रत्येक वेळी 60 टक्क्यांहून अधिक मते मिळवली होती. ‎‎मात्र, अलीकडील पोटनिवडणुकीत पक्षाचा मतांचा‎टक्का घसरला आहे.‎ हा निकाल नव्याने स्थापन झालेल्या जन सुराज पक्षापेक्षा ‎‎(जेएसपी) अधिक प्रशांत किशोर यांचा विजय मानला ‎‎जाईल. कारण 2025 च्या बिहार विधानसभा‎निवडणुकीत जेएसपीला प्रभाव पाडता आला नव्हता. ‎‎गुजरातमधील मंजलपूर मतदारसंघात भाजपला मोठ्या ‎‎मताधिक्याने विजय मिळाल्याने पक्ष आनंद साजरा करू ‎‎शकतो. मात्र, मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात‎आणखी एक धक्का बसला. येथे काँग्रेसचे उमेदवार‎घनश्याम सिंह यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचा‎पराभव केला. बांकीपूर हा भाजपचा मजबूत बालेकिल्ला‎राहिला आहे. 1995 नंतर या जागेवर पक्षाचा कधीही‎पराभव झाला नव्हता. गेल्या पाच वर्षांतील‎पोटनिवडणुकांची आकडेवारी पाहिली तर या काळात‎सत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांचा विजयाचा दर 78‎टक्के राहिला आहे, तर विरोधकांचा यशाचा दर केवळ‎22 टक्के होता. याच वर्षी सात जागांवर पोटनिवडणुकीत‎सर्व जागा सत्ताधारी पक्ष व आघाड्यांनी जिंकल्या‎होत्या. त्यापैकी पाच जागा भाजप-एनडीएने, तर दोन‎जागा कर्नाटकमध्ये काँग्रेसने जिंकल्या. 2025 मध्ये 15‎जागांवर पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी नऊ जागांवर‎सत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांनी विजय मिळवला, तर‎विरोधी उमेदवार सहा जागी विजयी झाले.‎ 2024 मध्ये 86 जागांवर पोटनिवडणुका झाल्या होत्या.‎त्यापैकी 69 जागांवर सत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांनी‎विजय मिळवला, तर विरोधकांना 17 जागांवर यश‎मिळाले. मात्र, बांकीपूरमधील पराभवामुळे भाजपसमोर‎अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या मतदारसंघाचे प्रथम‎प्रतिनिधित्व 1995 मध्ये विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष‎नितीन नवीन यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा‎यांनी केले होते. त्यांनी जनता दलाचे रामानंद यादव यांचा‎तीन टक्क्यांपेक्षाही कमी मताधिक्याने पराभव करून ही‎जागा जिंकली होती. त्यानंतर या जागेवर भाजपने सलग‎वर्चस्व राखले. 1995 ते 2006 या कालावधीत नवीन‎किशोर प्रसाद सिन्हा यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व‎केले.‎ त्यांच्या निधनानंतर 2006 मध्ये झालेल्या‎पोटनिवडणुकीत नितीन नवीन येथून निवडून आले.‎त्यांनी या मतदारसंघातून सलग पाच निवडणुका‎जिंकल्या. 2006 च्या पोटनिवडणुकीत त्यांना विक्रमी 82‎टक्के मते मिळाली होती. त्यानंतरही जवळपास प्रत्येक‎निवडणुकीत त्यांनी 60 टक्क्यांहून अधिक मते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मिळवली. केवळ 2020 मध्ये त्यांना 59.05 टक्के मते‎मिळाली होती. बिहारमध्ये दुहेरी इंजिनचे सरकार‎असतानाही बांकीपूरमध्ये भाजपचा मतदाराधार 28‎टक्क्यांहून अधिक कसा घसरला, हे अद्याप स्पष्ट‎झालेले नाही. बांकीपूरमध्ये उमेदवार बदलण्याचा आणि‎दतियामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांना‎उमेदवारी न देण्याचा निर्णय ही भाजपची रणनीतिक चूक‎होती का? सत्ताधारी पक्षाविषयी मतदारांच्या भूमिकेत‎झालेला बदल मंजलपूर आणि दतियामध्ये का दिसला‎नाही? प्रश्न उपस्थित करणे सोपे आहे, मात्र त्यांची उत्तरे‎शोधणे तितके सोपे नाही. संख्येने या केवळ तीन‎पोटनिवडणुका असल्या, तरी त्यांचे निकाल महत्त्वाचे‎आहेत. प्रत्येक निवडणूक भाजप अत्यंत गांभीर्याने घेत‎असल्याबाबत कोणतीही शंका नाही.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ बांकीपूरमध्ये भाजपच्या मतांच्या‎टक्केवारीतील घट ही पक्षासाठी‎सर्वात मोठी चिंतेची बाब ठरू शकते.‎या मतदारसंघातून पक्षाने सलग नऊ‎निवडणुका जिंकल्या होत्या. प्रत्येक‎निवडणुकीत 60 टक्क्यांवर मते‎मिळवली होती . पोटनिवडणुकीत‎मतांचा टक्का ‎घटला.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *